मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /मला IPS व्हायचं होतं, ताईला घेऊन जा मी चालले, 13 वर्षांच्या मुलीने संपवलं आयुष्य, बीड हळहळलं

मला IPS व्हायचं होतं, ताईला घेऊन जा मी चालले, 13 वर्षांच्या मुलीने संपवलं आयुष्य, बीड हळहळलं

मामाच्या गावाला राहत असलेल्या एका 13 वर्षीय मुलीने घरी ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली.

मामाच्या गावाला राहत असलेल्या एका 13 वर्षीय मुलीने घरी ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली.

मामाच्या गावाला राहत असलेल्या एका 13 वर्षीय मुलीने घरी ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली.

  • Local18
  • Last Updated :
  • Maharashtra, India

बीड, 29 मार्च : बीडमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मामाच्या गावाला राहत असलेल्या एका 13 वर्षीय मुलीने घरी ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. दिक्षा बाबासाहेब शेलार असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे. घटनास्थळी सुसाईट नोट आढळून आली त्यात मला आयपीएस व्हायच होतं झाले नाही. माझं सगळ संपल माझ्या ताईला कारखेलला घेऊन जा मी चालले..." असे लिहलेली सुसाईट नोट आढळून आली आहे. त्यामुळें खळबळ उडाली आहे.

आष्टी तालुक्यातील कारखेल बुद्रुक येथील दिक्षा बाबासाहेब शेलार ही बीडसांगवी येथील ससे वस्तीवरील आजोळी दुसरीत असल्यापासून आजोबा, मामाकडे राहत होती. दीक्षाचे आई, वडील उसतोड कामगार असल्याने मामा तिचा सांभाळ करत होता. 

ऑनलाईन टॉवेल ऑर्डर करताच महिलेच्या अकाऊंटमधून 8 लाख गायब; तुम्ही 'ही' चूक करत नाही ना?

काल घरातील सर्वजण शेतात काम करत होते. घरी एकटीच असलेल्या दिक्षाने सायंकाळ ६ वाजेच्या दरम्यान ओढणीच्या साह्याने गळफास घेऊन जीवन संपवले.  आष्टी पोलिस ठाण्यात आकस्मिक मुत्यूची नोंद करण्यात आली आहे. आत्महत्या का व कोणत्या कारणाने केली हे मात्र समजू शकले नाही.

First published:
top videos

    Tags: Beed, Beed news, Local18