विशाल देवकर, प्रतिनिधी नागपूर, 11 फेब्रुवारी : शहरातील सर्वात मोठा तलाव म्हणून प्रसिद्ध असलेला अंबाझरी तलाव म्हणजे नागपूरची शान आहे. येथील जैवविविधतेमुळे तलाव नेहमीच पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र राहिला आहे. मात्र, तो आता प्रदुषणाच्या विळख्यात सापडला आहे असून सर्वत्र जलकुंभी आणि जलपर्णीचे साम्राज्य पसरले आहे. एकीकडे कोट्यवधी रुपये खर्च करून शहर स्वच्छतेचे कार्यक्रम राबविले जात असताना या नैसर्गिक तलावाकडे दुर्लक्ष झाल्याची भावना व्यक्त होत आहे.
अंबाझरी तलाव पर्यटकांचे आकर्षण नागपूर तलावांचे शहर असून येथे गोरेवाडा, फुटाळा, शुक्रवार, सोनेगाव, अंबाझरी आदी तलाव आहेत. यातील अंबाझरी हा सर्वात मोठा तलाव आहे. शहरातून वाहणाऱ्या नाग नदीचा उगम याच तलावातून होतो. असंख्य पशुपक्षी, पाणथळ परिसंस्था, जैवविविधता इत्यादींचे भंडार आहे. हिवाळ्यातील हंगामात अनेक देशांतून विविध पक्षी या तलाव परिसरात येतात. त्यातच शहराच्या मध्यवर्ती भागात 750 हेक्टर जंगल ही एका शहराच्या दृष्टीने मोठी देणगी आहे. त्यामुळे अंबाझरी तलाव परिसर नेहमीच पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र राहिला आहे.
Inspiring Story : 20 वर्षांपासून रस्त्यावरची झाडं जगवणारा नागपूरकर, अनेकांना दिली प्रेरणा, Videoतलावाचे अस्तित्व धोक्यात
सध्या अंबाझरी तलावात मोठ्या प्रमाणावर जलकुंभी, बेशरम आणि जलपर्णी सारख्या वनस्पती वाढल्या आहेत. जलपर्णींची वाढ ही एका अर्थाने प्रदूषणाची निदर्शक आहे. जलपर्णीमुळे हवेतील ऑक्सिजन पाण्यात मिसळण्याची क्रिया मंदावते. मूळं दूषित पाण्यातील शिसं, पारा, इ. विषारी द्रव्यं शोषून घेतात. त्यामुळे पाणी जिथे जास्त प्रदूषित असेल तिथे जलपर्णी चटकन फोफावते. तलावातील जलपर्णीचे साम्राज्य असेच वाढत राहिल्यास तलावाचे अस्तित्व धोक्यात येऊ शकते.
चिंताजनक! नागपूरची हवा बनली घातक, ‘ही’ आहेत कारणं Videoपाणथळ जागा संवर्धनाची गरज
पाणथळ जागा या जैवविविधतेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या आहेत. म्हणून 2 फेब्रुवारी हा दिवस जगभर पाणथळ दिवस म्हणून साजरा केला जातो. संपूर्ण जगात 90% पेक्षा जास्त पाणथळ प्रदेश हा 1700 सालानंतर झपाट्याने संपुष्टात आला आहे. त्याची आकडेवारी लक्षात घेतली तर ती जंगलांच्या तुलनेत तीन पट अधिक आहे. त्यामुळेच ही मोठी धोक्याची घंटा असल्याचे म्हटले जाते. अशाप्रकारे पाणथळ जागा नष्ट झाल्यास त्याचे परिणाम जैवविविधतेवर होणार आहेत. त्यामुळे तलावाचे जतन, संवर्धन आणि संगोपन व्हावे अशी अपेक्षा पर्यावरण प्रेमींतून व्यक्त होत आहे.
धक्कादायक! नागपुरात भारत - ऑस्ट्रेलिया सामन्यात स्टेडियमवरच सट्टेबाजी; 4 बुकिंना अटकतलावाचे संवर्धन नागरिकांचीही जबाबदारी
अंबाझरी तलाव हा आधीच प्रदूषित तलावाच्या मार्गावर असताना या जलपर्णींचा विळखा पडणे चिंताजनक आहे. याचा परिणाम संपूर्ण परिसरातील जैवविविधतेवर होऊ शकतो. तसेच पाण्याच्या तुटवड्याचा प्रश्न सोडवण्यासाठी पाणथळ सारख्या स्त्रोतांचे संवर्धन करणे गरजेचे आहे. प्रशासनासोबतच सर्व नागरिकांचे देखील हे मूलभूत कर्तव्य असल्याचे मत मानद वन्यजीव रक्षक अजिंक्य भटकर यांनी व्यक्त केले आहे.