जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / धक्कादायक! नागपुरात भारत - ऑस्ट्रेलिया सामन्यात स्टेडियमवरच सट्टेबाजी; 4 बुकिंना अटक

धक्कादायक! नागपुरात भारत - ऑस्ट्रेलिया सामन्यात स्टेडियमवरच सट्टेबाजी; 4 बुकिंना अटक

चार बुकिंना अटक

चार बुकिंना अटक

नागपुरात सध्या ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यामधील पहिला कसोटी समाना सुरू आहे. मात्र सामन्यादरम्यान सट्टेबाजी सुरू असल्याचा प्रकार उघड झाला आहे.

  • -MIN READ Nagpur,Nagpur,Maharashtra
  • Last Updated :

नागपूर, 11 फेब्रुवारी :  नागपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नागपुरात सध्या ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यामधील पहिला कसोटी समाना सुरू आहे. मात्र सामन्यादरम्यान सट्टेबाजी सुरू असल्याचा प्रकार उघड झाला आहे.  भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया कसोटी सामन्यात स्टेडियममध्येच सट्टेबाजी सुरू होती. याची माहिती मिळताच पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत मोबाईलवर सट्टेबाजी करणाऱ्या चार बुकिंना पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींना हिंगना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं असून, यामध्ये आणखी कोणाचा समावेश आहे का? याचा तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. स्टेडियमवर सट्टेबाजी  घटनेबाबत अधिक माहिती अशी की, सध्या नागपूरच्या व्हीसीए स्टेडियमवर भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामधील पहिला कसोटी सामना सुरू आहे. या सामन्यादरम्यान स्टेडियमवरच सट्टेबाजी सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. स्टेडियमवर सट्टेबाजी सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. हेही वाचा :    टीसीला आयकार्ड मागितलं अन् समोर आलं भलतंच प्रकरण; मुंबई- नागरकोइल ट्रेनमधील धक्कादायक प्रकार चार जणांना अटक   मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी कारवाई केली असता स्टेडियममधून चार बुकिना ताब्यात घेण्यात आलं आहे. ते मोबाईलवरून सट्टेबाजी करत होते.  गुन्हे शाखेच्या युनिट पाचने ही करावाई केली आहे. आरोपींना पुढील चौकशीसाठी हिंगणा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: nagpur
  • First Published :
जाहिरात
जाहिरात