प्रतिकात्मक फोटो (सौजन्य-Canva)
नागपूर 09 मे : समलैंगिकतेचा मुद्दा मागील काही दिवसांपासून चांगलाच चर्चेत आला आहे. याचदरम्यान आता समलैंगिकतेच्या तणावातून एका विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तिच्या समलैंगिकतेला घरच्यांचा विरोध होता. याच कारणामुळे तरुणीनं हे टोकाचं पाऊल उचललं. ही घटना नागपूरच्या गिट्टीखदान परिसरात घडली आहे. सुसाईड नोटच्या माध्यमातून याबाबत मोठा धक्कादायक खुलासा झाला. बी.ए.च्या दुसऱ्या वर्षात शिकत असताना तिने घरच्यांना सांगितलं, की तिचा समलैंगिकतेकडे कल आहे. मात्र घरच्यांनी या गोष्टीला विरोध केला आणि तिच्यासाठी लग्नाकरता मुलगा शोधण्यास सुरुवात केली. याच कारणामुळे तरुणीने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली आहे. 21 वर्षांच्या इंजिनियर तरुणीच्या मृत्यूने हादरलं होतं पुणे; 350 व्यक्तींची चौकशी करूनही मृत्यूचं गूढ कायम या तरुणीचे वडील केंद्र सरकारच्या एका विभागात कार्यरत असून ते मूळचे उत्तर भारतातील आहेत. ती आई-वडील आणि लहान भावासोबत काटोल मार्गावरील कॉलनीत राहायची. रविवारी दुपारी या तरुणीचे आई-वडील आणि भाऊ बाहेर गेले होते. याचवेळी तिने सिलिंग फॅनला नायलॉन दोरीने गळफास घेतला. आई-वडील घरी आल्यावर मुलगी गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसली. त्यांनी लगेचच तातडीने तिला मेयो रुग्णालयात नेलं. मात्र, डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केलं. हे टोकाचं पाऊल उचलण्याआधी तरुणीने सुसाइड नोट लिहिली होती. लेस्बियन असल्याने कुटुंबीय तसंच समाज विरोध करत आहे. स्वत:च्या इच्छेनुसार जीवन जगता येत नसल्याने हे पाऊल उचलत असल्याचं तिने चिठ्ठीत म्हटलं. तसंच आपल्या कृत्याबद्दल तिच्या पालकांची माफीदेखील मागितली. मी लग्न केलं असतं तर त्या मुलाशी नीट संसार करता आला नसता आणि तोदेखील कधीच सुखी झाला नसता असंही तिने लिहिलं आहे.