JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Nagpur news: घर महाराष्ट्रात तर शेत तेलंगणात, 2 राज्यांच्या कचाट्यात गाव सोसतंय यातना, Video

Nagpur news: घर महाराष्ट्रात तर शेत तेलंगणात, 2 राज्यांच्या कचाट्यात गाव सोसतंय यातना, Video

चंद्रपूर जिल्ह्यातील प्रेमनगर हे गाव दोन राज्यांतील सीमावादाच्या पेचात सापडले आहे. येथील लोकांचं घर महाराष्ट्रात तर शेत तेलंगणात अशी स्थिती आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

विशाल देवकर, प्रतिनिधी नागपूर, 1 मे: 1 मे 1960 साली भारताच्या नकाशावर महाराष्ट्र राज्य स्वतंत्ररित्या अस्तित्वात आले. महाराष्ट्र स्थापनेच्या त्या ऐतिहासिक क्षणाला आता 63 वर्ष पूर्ण झाली आहेत. तरीही महाराष्ट्रात असे एक गाव अस्तित्वात आहे जिथे मूलभूत सेवा सुविधांसाठी देखील मोठा संघर्ष करावा लागतो आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यात महाराष्ट्र - तेलंगणा या दोन राज्यांच्या सीमेवर प्रेम नगर हे महाराष्ट्रातील शेवटचं गाव आहे. दोन राज्याच्या मध्ये मारलेल्या एका रेषेने इथला विकासच खुंटला आहे. येथील रहिवाशांचे घर महाराष्ट्रात तर शेत तेलंगणात अशी परिस्थिती आहे. या सीमाप्रश्नामुळे गावकऱ्यांचे प्रचंड हाल होत असल्याची भावना व्यक्त करत आहे. गावातील घर महाराष्ट्रात तर शेत तेलंगणात 1 मे 2023 रोजी महाराष्ट्र घटक राज्य म्हणून अस्तित्वात येऊन 63 वर्ष उलटून गेली आहेत. तरीही महाराष्ट्र आणि तेलंगणा राज्याच्या सीमेवर वसलेल्या काही गावांना आपल्या मूलभूत हक्कांसाठी झगडावे लागत आहे. प्रेम नगर हे गाव महाराष्ट्र - तेलंगणा सीमेवर आहे. या गावात दोन राज्याच्या सीमा असल्याने येथील घर महाराष्ट्रात तर शेत तेलंगणात अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. या दोन राज्याच्या वादात या गावातील नागरिकांची मात्र चांगलीच पिळवणूक होत असल्याचे चित्र आहे.

मूलभूत सुविधांपासून गावकरी वंचित आजही प्रेम नगर येथे शिक्षणासाठी शाळा, अंगणवाडी नाही. तसेच पाण्याची सुविधा, रस्ते, प्राथमिक आरोग्य केंद्र, अशा कोणत्याच सुविधा नाहीत. तेलंगणा राज्याची निर्मिती झाली तेव्हा पासून नागरिकांना शेतीचे पट्टे देण्यात आलेले नाहीत. तर महाराष्ट्र सरकारला आज 63 वर्षे होऊन सुद्धा महाराष्ट्राच्या नकाशात हे गावच अस्तित्वात नाही. तसेच महाराष्ट्रासह तेलंगणा सरकार सुद्धा या गावाकडे दूर्लक्ष करत आहे. दोन राज्याच्या सीमाप्रश्नाच्या तळाशी आम्ही देखील भारतीय असून या देशातील नागरिक आहोत या भावनेचाच विसर शासनाला पडला आहे का ? असा सवाल नोकेवडा ग्रामपंचायत, उपसरपंच सुधाकर जाधव यांनी उपस्थित केला आहे. Maharashtra Day 2023: महाराष्ट्राचा दुर्मीळ वारसा जपणारा संशोधक, ऐतिहासिक क्षणाचा अमूल्य ठेवा पाहिलात का? Video किमान भारतीय म्हणून तरी द्यावे लक्ष सीमा प्रश्नामुळे आमच्या गावातील रहिवासी फार हलाखीचे जीवन जगत आहेत. गावात मूलभूत सेवा सुविधांसाठी जिल्ह्याच्या गावी जावे लागते. गावातील सर्वांचीच परिस्थिती सर्वसाधारण असून सर्व शेतीवर अवलंबून आहेत. गावातील तरुणांचे डॉक्युमेंट्स दोन राज्यात विभागले असल्याने नोकरी मिळत नाही. तसेच दोन्ही राज्यातील शासकीय यंत्रणा देखील आमच्या कडे लक्ष देत नाहीत. आम्ही दोन राज्याच्या पेचात सापडले असून शासनाने आमच्याकडे किमान एक भारतीय म्हणून तरी लक्ष द्यावे, असे मत प्रेम नगर येथील रहिवासी रघुनाथ आडे यांनी व्यक्त केले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या