जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Maharashtra Day 2023: महाराष्ट्राचा दुर्मीळ वारसा जपणारा संशोधक, ऐतिहासिक क्षणाचा अमूल्य ठेवा पाहिलात का? Video

Maharashtra Day 2023: महाराष्ट्राचा दुर्मीळ वारसा जपणारा संशोधक, ऐतिहासिक क्षणाचा अमूल्य ठेवा पाहिलात का? Video

Maharashtra Day 2023: महाराष्ट्राचा दुर्मीळ वारसा जपणारा संशोधक, ऐतिहासिक क्षणाचा अमूल्य ठेवा पाहिलात का? Video

Maharashtra Din 2023: महाराष्ट्र राज्य स्थापनेची महोत्सव मुद्रा दुर्मिळ होण्याचा मार्गावर आहे. ऐतिहासिक क्षणाचा अमूल्य ठेवा तुम्हाला कुठं पाहायला मिळेल?

  • -MIN READ Nagpur,Maharashtra
  • Last Updated :

विशाल देवकर, प्रतिनिधी नागपूर, 29 एप्रिल: महाराष्ट्रातील सर्वांसाठी 1 मे 1960 हा आनंदाचा दिवस आहे. या दिवशी महाराष्ट्र राज्याची स्थापना होऊन भारताच्या नकाशावर ‘महाराष्ट्र’ स्वतंत्ररित्या अस्तित्वात आला. 30 एप्रिल 1960 च्या मध्यरात्री 12 वाजता भारताचे तत्कालिन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी नवनिर्मित महाराष्ट्र राज्याचा नकाशा प्रकाशमान करून  महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेची घोषणा केली. पंडितजींनी यशवंतराव चव्हाण यांच्या हाती महाराष्ट्राचा मंगलकलश दिला आणि नव्या महाराष्ट्राच्या नेतृत्वाची जबाबदारी सोपविली. हा मंगलमय क्षण महाराष्ट्रातील जनतेच्या स्मरणात राहावा, या हेतूने ‘महाराष्ट्र राज्य स्थापना महोत्सव मुद्रा’ प्रकाशित करण्यात आली. ऐतिहासिक मुद्रा होतेय दूर्मिळ महाराष्ट्र राज्य स्थापना महोत्सव मुद्रा 1 मे 1960 च्या स्थापना दिनाच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांना भेट म्हणून देण्यात आली. तसेच महाराष्ट्र शासनाच्या सर्व कर्मचाऱ्यांना देखील ही मुद्रा नंतर वितरित करण्यात आली. ही मुद्रा सोने, चांदी, तांबे आणि निकेल या धातूंपासून तयार करण्यात आली होती. मात्र आज महाराष्ट्र स्थापनेच्या 63 व्या वर्षात त्या ऐतिहासिक क्षणाची साक्ष पटविणारी ती ‘राजमुद्रा’ दुर्देवाने इतिहास जमा होण्याच्या मार्गावर आहे. काळाच्या ओघात आणि प्रगतीच्या वेगात अनेकांनी अर्थार्जनाच्या लोभापोटी ही राजमुद्रा कधी सोनाराच्या भट्टीत वितळवली. त्याचे दागिने तयार केले तर मुद्रेचे महत्त्व न पटल्यामुळे अनेकांच्या कडून ती गहाळ झाली.

News18लोकमत
News18लोकमत

कुणाकडे आहे अमूल्य ठेवा ? चंद्रपुरातील ज्येष्ठ नाणे अभ्यासक व नाणे संग्राहक अशोक सिंह ठाकूर यांनी हा अमूल्य ठेवा आपल्या संग्रही जतन करून ठेवला आहे. त्यांनी आजवर 20 वर्षाच्या अविरत संघर्षातून दूर्मिळ होत चाललेल्या या मुद्रेचा संग्रह करून तिचे जतन करण्याचा ध्यास घेतला आहे. आजवर त्यांनी 319 राजमुद्रा आपल्या संग्रही करून महाराष्ट्र स्थापनेचा एक ऐतहासिक ठेवा जपला आहे. ठाकूर यांच्या संग्रही 319 मुद्रा 20 वर्षापूर्वी चांदीची एक महाराष्ट्र राज्य स्थापना महोत्सव मुद्रा माझ्या संग्रही होती. कालांतराने मी त्यावर संदर्भ पुस्तके आणि माहिती मिळवली असता मला त्या मुद्रेचे महत्त्व लक्षात आले आणि माझ्या संग्रही हा ठेवा असल्याचा फार अभिमान वाटला. नंतर हा अमूल्य ठेवा मी माझ्या संग्रही असावा याचा ध्यास घेऊन शोध घेतला. आज माझ्या संग्रही 319 मुद्रा आहेत. ही मुद्रा सोने, चांदी आणि निकेल या धातूंपासून तयार करण्यात आली आहे. मात्र यातील सोन्याची मुद्रा अद्याप तरी माझ्या पाहण्यात नाही. मात्र शासकीय दस्तावेज मध्ये त्याचा उल्लेख येतो, असे ठाकूर यांनी सांगितले. Nagpur News: ‘या’ करारामुळं विदर्भ झाला संयुक्त महाराष्ट्राचा भाग, पाहा काय होती कलमं, Video कशी आहे महोत्सव मुद्रा? या राजमुद्रेच्या पृष्ठभागावर अशोक चक्र चिन्हांकित असून ही राजमुद्रा गोलाकार आहे. या राजमुद्रेवर ‘महाराष्ट्र राज्य स्थापना महोत्सव’ व वैशाख 11, 1882. 1 मे 1960 असेही गोलाकार अंकित करण्यात आले आहे. मुद्रेवर ‘प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्व वंदिता’ आणि खाली ‘महाराष्ट्रस्य राज्यस्य मुद्रा भद्राय राजते’ असे लिहले आहे. या ओळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेतून प्रेरित होऊन घेतल्या आहेत. ही केवळ एक नाणे, मुद्रा नसून महाराष्ट्राच्या स्थापनेच्या सुवर्णक्षणांची आठवण करून देणारा अमूल्य ठेवा आहे. शासनाने आणि नागरिकांनी देखील तो जपावा अशी एक नाणे अभ्यासक आणि नाणे संग्राहक म्हणून माझी भावना आहे, असे मत ठाकूर यांनी बोलताना व्यक्त केले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात