वाघांच्या संख्येबाबत आली Good News!

देशभरातील व्याघ्र प्रकल्पांच्या व्यवस्थापनातील कामगिरीचा अहवाल नुकताच केंद्र सरकारने जाहीर केला. 

समोर आलेल्या आकडेवारीनुसार देशात वाघांची संख्या 3 हजार 167 वर पोहचली आहे.

 2022 मध्ये भारतातील 53 व्याघ्र प्रकल्पांच्या सर्वेक्षणास सुरुवात झाली होती. 

टायगर कॅपिटल ऑफ इंडिया अशी ख्याती असलेल्या नागपूर जवळील पेंच व्याघ्र प्रकल्पाला 8 वे स्थान मिळाले आहे.

सर्वोत्तम मूल्यांकन प्राप्त करून पेंच व्याघ्र प्रकल्पाने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. 

नागपूरमधील पेंच व्याघ्र प्रकल्पाने 90.91टक्के गुण प्राप्त करून आठवा क्रमांक पटकावला. 

केरळमधील पेरियार व्याघ्रप्रकल्पाने 94.38. टक्क्यांसह देशात प्रथम स्थान मिळविले आहे. 

देशातील 12 व्याघ्र प्रकल्पांना सर्वोत्कृष्ट प्रवर्गात स्थान मिळाले आहे. 

उत्कृष्ट प्रवर्गामध्ये महाराष्ट्रातील ताडोबा-अंधारी, मेळघाट, नवेगाव-नागझिरा, सह्याद्री आणि बोर या प्रकल्पांचा समावेश आहे.

महाराष्ट्र मध्ये कमीत कमी वाघांची संख्या ही 390 च्या घरात पोहचली आहे.(फोटो सौजन्य- नारायण मालू)