JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Nagpur news : 'अंगात येतो नागोबा, सापाचं विष टाकतो पिऊन' भोंदूबाबाच्या स्टिंग ऑपरेशनचा VIDEO व्हायरल

Nagpur news : 'अंगात येतो नागोबा, सापाचं विष टाकतो पिऊन' भोंदूबाबाच्या स्टिंग ऑपरेशनचा VIDEO व्हायरल

या बाबाने तरुणाच्या हाताला साप चावला असताना पायाला चिरा मारून तिथून रक्त काढून पातेल्यात टाकलं.

जाहिरात

(नागपूरमधील घटना)

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

उदय तिमांडे, प्रतिनिधी नागपूर, 24 जुलै : हिस्स हिस…असा आवाज आला की तुम्हाला भीती वाटून साप आला असं वाटत असेल. पण थांबा हा आवाज सापाचा नसून अंगात साप आणणाऱ्या एका अघोरी कृत्याचा भाग आहे. याच अघोरी उपायाने दोन महिला आणि एका पुरुषाचा मृत्यू झाल्याचं बोललं जात आहे. या नागोबा बाबाचा हा सगळा बोगसपणा आता समोर आला असून याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. नागपूच्या रामटेक तालुक्यातील कट्टा गावात साप चावल्यानंतर दवाखान्यात न नेता भोंदू बाबाकडे उपचारासाठी नेतात. यामुळे नागपूरच्या वाईल्डलाईफ वेल्फेर सोसायटीच्या नितीश भांदक्कर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हा जीवघेणा प्रकार समोर आणला आहे.

संबंधित बातम्या

नितीश भांदक्कर यांनी आपल्या सहकार्याला सोबत घेऊन या अघोरी उपायांच्या विरोधात कारवाई करण्यासाठी स्वतःच्या सहकार्याला टाचण्या टोचून साप चावल्याचा बनाव केला. त्यानंतर त्याला कट्टा गावात साप चावल्याचं सांगून घेऊन गेले. काहींनी तेथीलच एका भोंदूबाबाकडे जाण्यास सांगितलं. जेव्हा तिथे पोहोचले तेव्हा हा सगळा धक्कादायक प्रकार सुरू झाला. सापाचं विष शरिरावर पसरलं असा दावा भोंदू बाबांच्या चेल्यांनी केला. त्यानंतर भोंदू बाबा आले त्यांच्या अंगात आता या मुलाला डसलेला साप येईल आणि तो जहर पिऊन जाईल, असं सांगितलं गेलं.

थोड्याच वेळात मंत्र उपचार पूजा सुरू झाली. अंगात साप आला आहे आणि बाबा हे आता  सापाचे विष पिणार असल्याचं सांगितलं. त्यानंतर या बाबाने तरुणाच्या हाताला साप चावला असताना पायाला चिरा मारून तिथून रक्त काढून पातेल्यात टाकलं आणि सापाचं विष बाहेर पडलं आहे, आता घाबरण्याची गरज नाही. दवाखान्यात जायची गरज नाही, असं सांगितलं. मुळात हा सगळा प्रकार भांडक्कर आणि त्याच्या सहकाऱ्यांनी कॅमेरात कैद केला. (चिमुकल्याचा तोंडात शिरली पाल, बाजारातुन घरी आलेल्या आईला समोर जे दिसलं ते पाहून उरलं नाही भान) त्यानंतर हा सगळा प्रकारा जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिक्षकांच्या समोर मांडण्यात आला. त्यानंतर आता जिल्हाधिकाऱ्यांना तसंच पोलीस अधीक्षकांना निवेदन देत कारवाईची मागणी केली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या