जाहिरात
मराठी बातम्या / Viral / चिमुकल्याचा तोंडात शिरली पाल, बाजारातुन घरी आलेल्या आईला समोर जे दिसलं ते पाहून उरलं नाही भान

चिमुकल्याचा तोंडात शिरली पाल, बाजारातुन घरी आलेल्या आईला समोर जे दिसलं ते पाहून उरलं नाही भान

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

या चिमुकल्याची आई काही वस्तू घेण्यासाठी दुकानात गेली असता हा प्रकार उघडकीस आला. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 24 जुलै : कधीकधी अशा काही गोष्टी समोर येत असतात की ज्याबद्दल जाणून आपल्याला विश्वास बसत नाही. असंच एक प्रकरण कोरबा येथील बांकीमोंग्रा परिसरातून समोर आलं आहे. इथे तीन वर्षांच्या निष्पाप बालकाच्या तोंडात पाल शिरली. ज्यामुळे त्या मुलाचा मृत्यू झाला. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. या चिमुकल्याची आई काही वस्तू घेण्यासाठी दुकानात गेली असता हा प्रकार उघडकीस आला. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. किंग कोब्राने दंश केला म्हणून गोणीत घेऊन हॉस्पिटलमध्ये पोहोचला मुलगा, पाहून डॉक्टरही थक्क कोरबा येथील बंकीमोंग्रा पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या नागीन भंठा येथे तीन वर्षांच्या निष्पाप बालकाचा मृत्यू झाल्याच्या बातमीने सर्वांनाच हादरवून सोडले. विषारी पाल त्या चिमुकल्याच्या तोंडात गेल्याने त्याचा मृत्यू झाला. या हृदयद्रावक घटनेनंतर घरात शोककळा पसरली आहे. राजकुमार संदे यांचे संपूर्ण कुटुंब नागीन भंठा येथे राहत असल्याचे सांगण्यात येत आहे. कुटुंबातील दोन भावंडांमध्ये सर्वात लहान असलेला जगदीश तीन वर्षांचा होता. तो घरात एका खाटेवर झोपला होता. त्याची आई काही वस्तू घेण्यासाठी जवळच्या दुकानात गेली होती. दरम्यान, त्याच्या तोंडात पाल शिरल्याने त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा करून मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. पीएम रिपोर्ट आल्यानंतरच मृत्यूचे खरे कारण समोर येईल, असे पोलिसांनी सांगितलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात