महाविकास आघाडीत नाराजीनाट्य
नागपूर, 13 एप्रिल : नागपूरमध्ये मविआची सभा होणार आहे. परंतु मविआच्या वज्रमूठ सभेआधीच महाविकास आघाडीमधील नाराजीनाट्य समोर येत आहे. काँग्रेस नेते नितीन राऊत हे नाराज असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र नितीन राऊत हे नाराज नाहीत, नितीन राऊत यांच्याशी मी स्वत: बोलणार असल्याचं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितलं आहे. तसेच अजित पवार हे आमच्यासोबतच असून, ते भाजपसोबत जाणार नसल्याचंही पटोले यांनी म्हटलं आहे. नेमकं काय म्हटलं पटोले यांनी नागपुरात महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा होणार आहे. या सभेआधीच महाविकास आघाडीमधील नाराजीनाट्य समोर येताना दिसत आहे. काँग्रेस नेते आणि माजी मंत्री नितीन राऊत नाराज असल्याची माहिती समोर येत आहे. मात्र नितीन राऊत हे नाराज नसून, मी स्वत: राऊत यांच्याशी बोलणार असल्याचं पटोले यांनी म्हटलं आहे. दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी शिंदे, फडणवीस सरकारला देखील जोरदार टोला लगावला आहे. महाविकास आघाडीची सभा नागपूरमध्ये होणार आहे. जे काही ग्राउंड नागपूरमध्ये होतं, ते हेरिटेज म्हणून जाहीर करण्यात आलं आहे. सरकार आमच्या सभेला घाबरलं असा टोला पटोले यांनी लगावला आहे.
अजित पवारांवर प्रतिक्रिया दरम्यान अजित पवार हे भाजपसोबत जाणार असल्याची चर्चा सुरू आहे. यावर देखील नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार हे आमच्यासोबत आहेत, आमचा विश्वास आहे की ते भाजपसोबत जाणार नाहीत असं पटोले यांनी म्हटलं आहे. तसेच शरद पवार यांना साईड लाईन करून चालणार नाही, शरद पवार हे जेव्हाही विरोधी पक्ष नेत्यांच्या बैठका बोलावतील तेव्हा आम्ही जाऊ असंही यावेळी नाना पटोले यांनी म्हटलं.