JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Buldhana Bus Accident : बस 5 वाजता नागपूरहून निघाली अन्..., जाणून घ्या अपघाताचा संपूर्ण घटनाक्रम

Buldhana Bus Accident : बस 5 वाजता नागपूरहून निघाली अन्..., जाणून घ्या अपघाताचा संपूर्ण घटनाक्रम

अपघाताबाबत समोर आलेल्या माहितीप्रमाणे ही बस नागपूरहून सायंकाळी पाच वजाता पुण्याकडे निघाली होती.

जाहिरात

बुलडाण्यात भीषण अपघात

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

बुलडाणा, 1  जूलै :   समृद्धी महामार्गावर शनिवारी पहाटे बसचा भीषण अपघात घडला आहे. हा अपघात एवढा भीषण होता की या अपघातामध्ये बसमधील 25 जणांचा जळून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर आठ प्रवाशी जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या बसमधून एकूण 33 प्रवासी प्रवास करत होते. नागपूरहून सायंकाळी पाच वाजता निघाली बस  अपघाताबाबत समोर आलेल्या माहितीप्रमाणे ही बस नागपूरहून सायंकाळी पाच वजाता पुण्याकडे निघाली होती. ही बस विदर्भ ट्रॅव्हल्सची होती. ही बस वर्ध्यात रात्री सात वाजता पोहोचली. त्यानंतर ती रात्री साडेआठच्या सुमारास यवतमाळला पोहोचली. रात्री आकरा वाजता ती कारंजाहून निघाली होती. त्यानंतर रात्री दीडच्या सुमारास या बसचा सिंधखेडपासून जवळच असलेल्या पिंपळखुटी जवळ अपघात झाला. या अपघातामध्ये 25 जणांचा मृत्यू झाला आहे.

Buldhana Bus Accident : बसच्या भीषण अपघाताचा पहिला Video समोर, 25 जणांचा जळून कोळसा

संबंधित बातम्या

मुख्यमंत्र्यांकडून मदतीची घोषणा दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या अपघातामध्ये मृत्यू झालेल्या लोकांच्या कुटुंबांना प्रत्येकी पाच लाखांची मदत जाहीर केली आहे. समृद्धी महामार्गावर अपघात घडू नये यासाठी सरकारकडून आवश्यक त्या उपाय योजना राबवल्या जात आहेत. मात्र या महामार्गावर अनेक अपघात हे ओव्हर स्पीडमुळे होत असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. चालकांनी वाहतूक नियमांचं पालन करावं असं आवाहनही मुख्यमंत्र्यांकडून करण्यात आलं आहे. मुख्यमंत्र्यांकडून या अपघाताच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच जखमींच्या उपचाराचा खर्चही सरकार करणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या