जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Buldhana Bus Accident : बसच्या भीषण अपघाताचा पहिला Video समोर, 25 जणांचा जळून कोळसा

Buldhana Bus Accident : बसच्या भीषण अपघाताचा पहिला Video समोर, 25 जणांचा जळून कोळसा

भीषण अपघातामध्ये 25  जणांचा मृत्यू

भीषण अपघातामध्ये 25 जणांचा मृत्यू

समृद्धी महामार्गावर शनिवारी पहाटे बसचा भीषण अपघात घडला आहे. या अपघातात आतापर्यंत 25 जणांचा मृत्यू झालाय. या अपघाताचा व्हिडीओ आता समोर आला आहे.

  • -MIN READ Buldana,Buldana,Maharashtra
  • Last Updated :

बुलडाणा, 1 जूलै :  समृद्धी महामार्गावर अपघाताची मालिका सुरूच आहे. शनिवारी पहाटे बसचा भीषण अपघात घडला आहे. हा अपघात एवढा भीषण होता की या अपघातामध्ये बसमधील 25 जणांचा जळून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर आठ प्रवाशी जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या बसमधून एकूण 33 प्रवासी प्रवास करत होते. या अपघाताचा पहिला व्हिडीओ आता समोर आला आहे. ही प्रवासी बस नागपूरहून पुण्याकडे जात असताना हा अपघात झाला. मिळत असलेल्या माहितीप्रमाणे ही बस विदर्भ ट्रॅव्हल्सची होती. समृद्धी महामार्गावर सिंदखेड राजाजवळील पिंपळखुटा गावाजवळ बस रस्ता दुभाजकावर आदळली. यानंतर बसला आग लागली. प्रवासी झोपेत असल्यामुळे त्यांना बाहेर पडता आला नाही. या अपघातामध्ये 25 जणांचा जळून मृत्यू झाला आहे. तर आठ जण बचावले आहेत. यामध्ये तीन चिमुकल्यांचाही समावेश असल्याची माहिती समोर येत आहे.

जाहिरात
News18लोकमत
News18लोकमत

चालकाला घेतलं ताब्यात  व्हिडीओमध्ये बसला आग लागल्याचं दिसत आहे. टायर फुटल्यानं बस दुभाजकाला धडकल्याचा दावा या बसचा चालक दानिश शेख इस्माईल शेख याने केला आहे. पोलिसांनी चालकाला तब्यात घेतलं आहे. अपघाताबाबत चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: accident
  • First Published :
जाहिरात
जाहिरात