JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / गुडन्यूज! पुण्यासह या जिल्ह्यात 48 तासांत मान्सून दाखल होणार

गुडन्यूज! पुण्यासह या जिल्ह्यात 48 तासांत मान्सून दाखल होणार

पुढील 48 तासां मान्सूनच्या सरी मुंबईसह महाराष्ट्रात बरसू शकतात. अरबी समुद्रात आता कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे.

जाहिरात

मान्सून

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई : जून महिना संपत आला तर पावसाने दडी मारल्याने, नागरिक हैराण झाले आहेत. मात्र हवामान विभागाने पावसाची प्रतीक्षा करणाऱ्यांना दिलासादायक बातमी दिली आहे. या आठवड्या अखेरीस, म्हणजेच पुढील 48 तासां मान्सूनच्या सरी मुंबईसह महाराष्ट्रात बरसू शकतात. अरबी समुद्रात आता कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. मान्सून सक्रिय होण्याची ही चिन्हे आहेत. परिणामी मान्सून येत्या 48 तासांत मुंबईत दाखल होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. पुणे, महाराष्ट्राचा दक्षिण मध्य भाग, मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्राच्या भागात मान्सून सक्रिय होण्याची शक्यता आहे.

Sangli News: ऐन पावसाळ्याच्या तोंडावर सांगलीत मोठी समस्या, ‘कृष्णामाई’ का रुसली? Video

मराठवाडा, विदर्भात 23 जूननंतर पावसाला सुरु होण्याची शक्यता आहे.  महत्त्वाचं म्हणजे येत्या रविवारपासून सर्वत्र चांगला पाऊस सुरु होईल, असं भाकीत हवामान खात्याने केले आहे. पावसाचं पुनरागमन झाल्यानंतर शेतकऱ्यांनाही दिलासा मिळेल, मात्र पावसाचे पूर्वानुमान पाहून पेरणीचे नियोजन करावं, असं आवाहन शेतकऱ्यांना करण्यात येतं आहे.

मान्सूनने दांडी मारली आहे. मृगाचा पेरा नाही की मोराचा तोराही नाही. हस्त नक्षत्राची बरसात झालीच नाही. परिणामी छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील अपूर्ण असलेल्या पेरण्या खोळंबून राहिल्या आहेत.

काय सांगता? ‘या’ मंदिरात कळतं यावर्षी पाऊस किती पडेल, यंदाचं अनुमान काय?

संबंधित बातम्या

पावसाअभावी कोवळी पिके करपून जाण्याची भीती व्यक्त होत असतानाच खोळंबलेल्या पेरण्या अन् दुबार पेरणीच्या धास्तीने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. उन्हाच्या झळांमुळे काही ठिकाणी मिळेल तिथून पाणी घेऊन पिके जगविण्याचा केविलवाणा प्रयत्न शेतकऱ्यांकडून होत आहे. महीना झाला तरी पावसाने हजेरी लावली नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या