महाराष्ट्राचं पावसाळी अधिवेशन व्हीपवरून गाजणार
मुंबई, 17 जुलै : महाराष्ट्राच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरूवात होणार आहे, पण या अधिवेशनात व्हीपचा मुद्दा गाजणार हे स्पष्ट झालंय. शिवसेना आणि शिवसेना ठाकरे गट तसंच राष्ट्रवादीतल्या दोन गटात व्हीपच्या मुद्द्यावरून जोरदार राजकारण सुरू झालं आहे. प्रतोद कुणाचा, व्हीप कुणाचा? कुणाचा व्हीप लागू होणार? सुनिल प्रभू का भरत गोगावले? जितेंद्र आव्हाड का अनिल पाटील? आजपासून सुरू होणाऱ्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या घडामोडींच्या अनुशंगाने मुख्य प्रतोद कोण? हा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर सुनिल प्रभू यांचाच व्हीप प्रत्येकाला लागू होणार असून भरत गोगावले हे बोगस प्रतोद असल्याचा टोला ठाकरे गटाचे आमदार सुनिल राऊत यांनी लगावला आहे. पण शिवसेनेने सुनिल राऊत यांचा दावा फेटाळून लावत त्यांचाच व्हीप बंधनकारक असल्याचं ठासून सांगितलं आहे. एका शिवसेनेच्या दोन शिवसेना झाल्या तसाच प्रकार राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही घडला, त्यामुळे शरद पवार आणि अजित पवार गटात संघर्ष होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. व्हीप बजावण्याची व्यवस्था आमचे मुख्य व्हीप जितेंद्र आव्हाड बजावणार आहेत, असं जयंत पाटील यांनी सांगितलं आहे. ‘पत्राऐवजी ग्रंथ लिहिला’, अधिवेशनाआधी फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा राजकीय पक्षांसाठी व्हीप का महत्त्वाचा? संसदीय कामकाजासाठी प्रत्येक राजकीय पक्षाचा प्रतोद नेमला जातो. आपल्या पक्षाच्या सगळ्या आमदारांवर नियंत्रण ठेवण्याचं काम प्रतोद करतो. विधानसभेत महत्त्वाच्या विषयांवर मतदान नियोजित असतं किंवा महत्त्वाच्या विषयावर चर्चा नियोजित असते, तेव्हा संबंधित पक्षाने सरकारच्या बाजूने किंवा विरोधात जो काही निर्णय घेतला असेल तो प्रतोद आदेशाद्वारे जारी करतो. प्रतोदाच्या या आदेशालाच पक्षादेश म्हणतात. आदेशासाठी तीन प्रकारचे व्हीप असतात, वन लाईन व्हीप, टू लाईन व्हीप आणि थ्री लाईन व्हीप. हे तीनही व्हीप प्रतोद बजावत असतो. पावसाळी अधिवेशनात व्हीपचा मुद्दा चांगलाच पेटणार असल्याचं स्पष्ट होत आहे. ‘दादांचं काम पहाटे सुरू, मी रात्री उशिरापर्यंत, तर फडणवीस…’, मुख्यमंत्र्यांची फटकेबाजी