JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / राज ठाकरेही हळहळले, अहमद पटेलांचा सत्तेच्या मोहात न पडणं हा गुण दुर्मिळच!

राज ठाकरेही हळहळले, अहमद पटेलांचा सत्तेच्या मोहात न पडणं हा गुण दुर्मिळच!

अहमद पटेल कमालीचे चाणाक्ष, बुद्धिमान नेते होते….

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 25 नोव्हेंबर: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल (Ahmed Patel) यांचं निधन झालं. वयाच्या 71 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कोरोनाची (Coronevirus)लागण झाल्यामुळे त्यांच्यावर गुरुग्राम येथील मेदांता हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. मात्र, उपचार सुरू असताना बुधवारी पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. अहमद पटेल यांच्या निधनाचे महाराष्ट्र नवनिर्मान सेना अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. ट्विटरवर शोक संदेश पोस्ट करून राज यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. अहमद पटेल ह्यांचं निवासस्थान अनेक सत्तांतराचं केंद्रस्थान होऊन देखील स्वतः सत्तेच्या, पदांच्या मोहात न पडणं हा गुण दुर्मिळच, असंही राज म्हणाले. हेही वाचा.. विश्व हिंदू परिषदेच्या नेत्याच्या शेंडीवर न्हाव्यानं फिरवली कात्री, नंतर झालं अ सं… अहमद पटेल कमालीचे चाणाक्ष, बुद्धिमान नेते होते, राजकारणाला बुद्धिबळाच्या पटावर ठेवून डाव-प्रतिडाव खेळण्यात ते माहीर होते, पण ही असाधारण क्षमता त्यांनी राजकीय लढाया जिंकण्यापुरतीच वापरली. तिला कधी त्यांनी व्यक्तिगत हेवेदावे ह्यासाठी वापरलं नाही. त्यामुळेच ह्या खंडप्राय देशाच्या कानाकोपऱ्यातील सर्वपक्षीय राजकीय नेत्यांशी त्यांचे सलोख्याचे संबंध होते, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

संबंधित बातम्या

राज ठाकरे म्हणतात, राजकारणाच्या पलीकडे जाऊन त्यांचा एखाद्याशी स्नेह तयार झाला की त्या व्यक्तीच्या व्यक्तिगत आयुष्यातील सुखदुःखांच्या प्रसंगात ते ठाम उभे राहत ह्याचा अनुभव मी देखील घेतला आहे. 43 वर्षे सक्रिय राजकारणात राहून, आणि अहमद पटेल ह्यांचं निवासस्थान अनेक सत्तांतराचं केंद्रस्थान होऊन देखील स्वतः सत्तेच्या पदांच्या मोहात न पडणं हा गुण दुर्मिळच. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फ अहमद पटेल ह्यांना विनम्र श्रद्धांजली, असं राज ठाकरे यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे. दरम्यान, अहमद पटेल यांना मागील ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कोरोनाची लागण (Ahmed Patel COVID Infected) झाली होती. त्यांचे कोरोनाचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले होते. त्यामुळे त्यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे. अहमद पटेल यांचा मुलगा फैसल (Faisal Patel) याने वडिलांचे दु:ख निधन झाले आहे, अशी माहिती दिली. गुजरातचे राज्यसभा खासदार अहमद पटेल यांचं पहाटे 3.30 वाजता निधन झालं, अशी माहिती दिली. हेही वाचा… ‘आता तुम्ही चौकशीला घाबरलं पाहिजे’, राऊतांनी दिले भाजप नेत्याच्या चौकशीचे संकेत ‘माझ्या वडिलांना महिन्याभराआधी कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचे अवयव निकामी झाले. त्यामुळे त्यांची प्रकृती आणखी खालावली होती. त्यामुळे त्यांचे निधन झाले’, अशी दु:खद माहिती फैसल पटेल यांनी दिली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या