देहरादून, 25 नोव्हेंबर: विश्व हिंदू परिषदेच्या (Vishwa Hindu Parishad) नेत्याची एका हेअर ड्रेसरने (न्हावी) शेंडी कापल्यावरून उत्तराखंडमध्ये (Uttarakhand) मोठा गोंधळ उडाला आहे. केस कापताना हेअर ड्रेसरने नेत्याची शेंडीवरच कात्री फिरवली.
धार्मिक भावना दुखावण्यासाठी हेअर ड्रेसरनं हा प्रकार जाणूनबुजून केल्याचा आरोप विश्व हिंदू परिषदेच्या नेत्यानं केला आहे. या प्रकरणी हेअर ड्रेसरविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा...'आता तुम्ही चौकशीला घाबरलं पाहिजे', राऊतांनी दिले भाजप नेत्याच्या चौकशीचे संकेत
'लोकमत'मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, उत्तराखंडमधील हल्द्वानी येथे हा धक्कादायक प्रकार घडला आहे. केस कापताना हेअर ड्रेसरनं विश्व हिंदू परिषदेच्या नेत्याची शेंडी कापली. हा प्रकार समोर येताच मोठा गोंधळ उडाला. गावात तणाव वाढत असल्याच पाहातच हेअर ड्रेसर पसार झाला आहे. या प्रकरणाला वेगळं वळण लागू नये, यासाठी पोलिसांनी हेअर ड्रेसरविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
विश्व हिंदू परिषदेचे माजी जिल्हाध्यक्ष विशंभर दत्त पलडिया हे हल्द्वानी येथील लामाचौड येथे राहतात. विशंभर पलडिया हे गेल्या सोमवारी हेअर ड्रेसरकडे केस कापण्यासाठी गेले होते. दरम्यान, हेअर ड्रेसरकडून केस कापताना पलडिया यांची शेंडी कापली गेली. यावरून मोठा गोंधळ उडाला. धार्मिक भावना दुखावण्यासाठी हेअर ड्रेसरनं हा प्रकार जाणूनबुजून केल्याचा आरोप विशंभर पलडिया यांनी केला आहे.
हेही वाचा...वर्षाला 330 रुपये भरून मिळेल 2 लाखाचा फायदा, वाचा काय आहे पोस्ट ऑफिसची योजना
हेअर ड्रेसरला अटक...
या प्रकारानंतर लामाचौड येथे तणाव वाढल्यानंतर संबंधित हेअर ड्रेसर पसार झाला होता. मात्र, पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर हेअर ड्रेसरला पोलिसांनी अटक केली आहे. हेअर ड्रेसरविरुद्ध भादंवि कलम 295 (अ) नुसार गुन्हा नोंदवण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.