JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / MLC Election Results 2020: औरंगाबादेत भाजपचा धुव्वा, राष्ट्रवादीचे सतीश चव्हाण यांची विजयाची हॅट‌्ट्रिक

MLC Election Results 2020: औरंगाबादेत भाजपचा धुव्वा, राष्ट्रवादीचे सतीश चव्हाण यांची विजयाची हॅट‌्ट्रिक

भाजपचे उमेदवार शिरीष बोराळकर यांचा दारुण पराभव करत सतीश चव्हाण यांनी सलग तिसऱ्यांदा निवडून येण्याचा बहुमान मिळवला

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

औरंगाबाद, 4 डिसेंबर: औरंगाबाद पदवीधर निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार आणि महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांनी विजयाची हॅटट्रिक साधली आहे. भाजपचे उमेदवार शिरीष बोराळकर यांचा दारुण पराभव करत सतीश चव्हाण यांनी सलग तिसऱ्यांदा निवडून येण्याचा बहुमान मिळवला आहे. सतीश चव्हाण यांना 1 लाख 18 हजार 638 मते मिळाली तर शिरीष बोराळकर यांना 58 हजार 743 मते मिळाली. एकूण वैध मते 2 लाख 18 हजार 816 तर 23092 मते बाद ठरली. सतीश चव्हाण यांनी विजय मिळवताच आघाडी घेताच काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेच्या नेत्यांनी त्यांचे अभिनंदन केलं. मतमोजणीच्या आणखी दोन फेऱ्या शुक्रवारी पहाटेपर्यंत सुरू होत्या. हेही वाचा… औरंगाबादेत तणाव! तरुणीवरून झालेल्या वादातून दोन गटात फ्री स्टाईल, VIDEO आला समोर दरम्यान, विधान परिषदेच्या 6 जागांसाठी झालेल्या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. धुळे-नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचा पहिला निकाल आला. भाजपचे अमरीश पटेल यांनी दणदणीत विजय मिळवला. मात्र, उर्वरित पाचपैकी 4 जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार आघाडीवर आहेत. सुरुवातीपासून सतीश चव्हाणांची आघाडी… सन 2014 च्या तुलनेत यंदा दुप्पट मतदान झाल्याने औरंगाबाद पदवीधर निवडणुकीत भाजप व आघाडीत चुरशीची लढत होण्याची चिन्हे होती. मात्र सतीच चव्हाणांनी पहिल्या फेरीपासूनच आघाडी घेतल्याने भाजपच्या विजयाच्या आशा मावळल्या होत्या. महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांनी रात्री 2 वाजता जाहीर झालेल्या तिसऱ्या फेरीत भाजपचे उमेदवार शिरीष बोराळकर यांच्यावर 41 हजार 198 मतांची निर्णायक आघाडी घेतली होती. त्यामुळे आमदारकीची हॅट‌्ट्रिक साधण्याचा त्यांचा मार्ग आधीच मोकळा झाला होता. हेही वाचा… आताशी कुठे झाली होती नवदाम्पत्याच्या आयुष्याची सुरूवात, क्षुल्लक वादानं केला घात तिसऱ्या फेरीअखेर चव्हाणांना एकूण 81216 मते, बोराळकरांना 40018 मते मिळाली. सतीश चव्हाण यांना 1 लाख 18 हजार 638 मते मिळाली तर शिरीष बोराळकर यांना 58 हजार 743 मते मिळाली. एकूण वैध मते 2 लाख 18 हजार 816 तर 23092 मते बाद ठरली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या