सचिन जिरे, (प्रतिनिधी)
औरंगाबाद, 3 डिसेंबर: शहरातील जालांन नगरमधील एका उद्यानात दोन गट आपसात भिडले. लाठ्या-काठ्यांनी तरुणांनी एकमेकांवर हल्ला केला. एका तरुणीवरून झालेल्या वादातून ही हानामारी झाल्याचं बोललं जात आहे. पोलील आल्याचं पाहाताच दोन्ही गटांतील तरुणांनी पोबारा केला. मात्र, या घटनेनंतर परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झालं आहे.
हेही वाचा...आताशी कुठे झाली होती नवदाम्पत्याच्या आयुष्याची सुरूवात, क्षुल्लक वादानं केला घात
मिळालेली माहिती अशी की, एका तरुणीवरून तरुणांच्या दोन गटात वाद झाला. काही वेळातच हा वाद वाढला. तरुणांच्या दोन गटांनी लाठ्या-काठ्या घेत एकमेकांवर हल्ला चढवला. ही घटना शहरातील जालांन नगर भागातील एका उद्यानात घडली. या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण पसरले असून पोलीस आल्याची कुणकुण लागताच दोन्ही गटांनी पळ काढला. या प्रकरणी सातारा पोलीस ठाण्यात दुपारपर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता. पोलीस हानामारी करणाऱ्या तरुणांचा शोध घेत आहेत.
#औरंगाबाद :शहरातील जलानानगर मधील उद्यानात तरुणाचे दोन गट आपसात भिडले,
लाठ्या-काठ्यांनी केला एकमेकांवर हल्ला.. pic.twitter.com/2a5uxKcdoe
— News18Lokmat (@News18lokmat) December 3, 2020
परस्पर तक्रारीवरून 41 जणांवर गुन्हा दाखल
दरम्यान, गेल्या आठवड्यात जुन्या भांडणाच्या कारणावरून हिंगोलीत दोन गटांत हाणामारी झाली होती. शहर पोलिस ठाण्यात 41 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हिंगोली शहरातील रेल्वेस्टेशन रोड भागात जून्या भांडणाच्या कारणावरून दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. या प्रकरणी परस्पर तक्रारीवरून 41 जणांवर हिंगोली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. घटनास्थळी वरिष्ठ पोलिस अधिकारी दाखल झाल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली आहे. सध्या शहरात वाढीव पोलिस बंदोबस्त तैनात असून पोलिसांची गस्तही सुरु आहे.
हेही वाचा...मालेगाव ब्लास्ट: प्रज्ञासिंह ठाकूर गैरहजर, सर्व आरोपींना दिले 'हे' निर्देश
शहरातील रेल्वेस्टेशन रोड भागातील प्रशांत पिल्ले व शेख इस्माईल यांच्यात मागील काही दिवसांत वाद सुरु होता. त्यामुळे मागील काही दिवसांपासून त्यांच्या कुरबुरी सुरुच होत्या. दरम्यान, हा वाद वाढल्याने दोन्ही गट समोरासमोर आले. त्यानंतर काही वेळातच हाणामारी सुरु झाली. त्यामुळे परिसरात एकच गोंधळ निर्माण झाला. या हाणामारीची माहिती मिळताच पोलिस अधिक्षक राकेश कलासागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकानं घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. घटनास्थळावर दंगाकाबू पथक देखील तैनात करण्यात आले होते.