JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Malad Railway Accident: डबा धुण्याचं निमित्त अन् एका क्षणाच सर्वच संपलं! ट्रेनचा धक्का लागून तरुणाचा मृत्यू

Malad Railway Accident: डबा धुण्याचं निमित्त अन् एका क्षणाच सर्वच संपलं! ट्रेनचा धक्का लागून तरुणाचा मृत्यू

Malad Railway Station Accident: मलाड रेल्वे स्टेशनवरील एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये एका 17 वर्षीय तरुणाचा रेल्वेचा धक्का लागून मृत्यू झालाय.

जाहिरात

मलाड ट्रेन अपघात

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

Malad Railway Station Accident: लोकल ट्रेनला मुंबईची लाइफलाइन असं म्हटलं जातं. मात्र ही लाइफलाइन अनेकांचे प्राणही घेते. रेल्वेमध्ये चढताना हात निसटणे किंवा निष्काळजीपणे चालू ट्रेनमध्ये चढताना पाय घसरणे अशा अनेक घटना आपण नेहमीच पाहत असतो. रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी नेहमीच प्रयत्नशील असते. वेळोवेळी रेल्वेकडून प्लॅटफॉर्म पासून दूर राहण्यासह विविध सूचनाही दिल्या जातात. प्रवाशांना जागृतही केलं जातं मात्र तरीही प्रवासी ही याकडे दुर्लक्ष करतात. मग यातून दुर्घटना घडताना दिसतात. अशीच एक घटना मलाड रेल्वे स्टेशनवर घडली. येथे एका तरुणाला जलद ट्रेनचा धक्का लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. मुंबईच्या मालाड रेल्वे स्टेशनवरुन एक थरारक सीसीटीव्ही फूटेज व्हायरल झालंय. यामध्ये दोन तरुण मुंबईच्या मालाड रेल्वे स्टेशनवरील प्लॅटफॉर्म तीनवर जेवणाचा डबा खातात. यानंतर ते डबा धुण्यासाठी रेल्वे ट्रॅकडे जातात. तिथे उभे असताना अचानक जलद लोकल येते. याच लोकलचा धक्का लागून अनर्थ घडतो. या अपघातात एका 17 वर्षीय तरुणाला आपला जीव गमवावा लागला आहे. मयंक अनिल शर्मा असं या मृत झालेल्या तरुणाचं नाव आहे. Sangali News : 11 महिन्यांचा संसार क्षणात संपवला; रात्री जेवणं करुन खोलीत गेले ते पुन्हा उठलेच नाहीत ही घटना 17 जून या दिवशी दुपारी साडेतीन वाजताची असल्याची माहिती आहे. यावेळी दोन तरुण प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वरील कट्ट्यावर बसून डबा खातात. एकत्र जेवण केल्यानंतर ते दोघंही जेवणाचा डबा आणि हात धुण्यासाठी प्लॅटफॉर्मवर उभे राहतात. मात्र यावेळी अचानक चर्चगेटच्या दिशेने बोरिवलीकडे जाणारी जलद लोकल आणि होत्याचं नव्हतं झालं. या ट्रेनची दोघांपैकी एकाला जोरदार धडक बसली आणि तो प्लॅटफॉर्मवर दूरपर्यंत फेकला गेला. या धडकेत त्याच्या डोक्याला जोरदार मार बसला आणि त्याच्या कानातून रक्तस्त्राव सुरु झाला. यानंतर त्याला उपचारांसाठी शताब्दी हॉस्पिटलमध्ये कांदिवलीमध्ये दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केलं. Pune Accident : पुण्यातील चांदणी चौकात भीषण अपघात, टेम्पो ट्रॅव्हलर पलटली; वाहतूक मंदावली

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या