जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Sangali News : 11 महिन्यांचा संसार क्षणात संपवला; रात्री जेवणं करुन खोलीत गेले ते पुन्हा उठलेच नाहीत

Sangali News : 11 महिन्यांचा संसार क्षणात संपवला; रात्री जेवणं करुन खोलीत गेले ते पुन्हा उठलेच नाहीत

दाम्पत्यानं संपवलं जीवन

दाम्पत्यानं संपवलं जीवन

राज संजय जाधव वय वर्ष २३ आणि त्यांच्या पत्नी ऋतुजा राज जाधव वय वर्ष २० या नवदाम्पत्यांनी विषारी औषध घेऊन आयुष्य संपवलं.

  • -MIN READ Sangli,Maharashtra
  • Last Updated :

आसिफ मुरसल, प्रतिनिधी सांगली : लग्न होऊन 11 महिने झाले, नव दाम्पत्याने टोकाचे पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला. कुटुंबासोबत जेवले आणि त्यानंतर जे रात्री झोपायला म्हणून खोलीत गेले ते पुन्हा उठलेच नाहीत. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. तासगाव तालुक्यातील येळावी जाधव मळा इथे ही घटना घडल्याची माहिती मिळाली आहे. राज संजय जाधव वय वर्ष २३ आणि त्यांच्या पत्नी ऋतुजा राज जाधव वय वर्ष २० या नवदाम्पत्यांनी विषारी औषध घेऊन आयुष्य संपवलं. हा प्रकार बुधवारी रात्री घडला. त्यांच्या मृत्यूचे कारण समजू शकले नाही. या घटने बद्दल तासगाव पोलीसात नोंद झाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत राज आणि ऋतुजाचं लग्न 11 महिन्यापूर्वी झालं होतं. राज यांचं बी एस सीपर्यंतचे शिक्षण झालं असून, नोकरीच्या शोधात होते. सध्या ते स्वतःची शेती करत होते तर त्यांच्या पत्नी गृहिणी म्हणूनच काम करीत होत्या.

शेतकरी विहिरीत पडला अन् मृतदेहावर फणा काढून नाग बसला, अंगाचा थरकाप उडवणारा VIDEO

राज, त्यांच्या पत्नी ऋतुजा राज यांचे आई-वडिल व लहान भाऊ असे एकत्रितपणे राहात होते. बुधवारी रात्री सर्व कुटुंबियांनी एकत्रत जेवण केलं. त्यानंतर राज आणि ऋतुजा हे नवदाम्पत्य आपल्या बेडरूम मध्ये झोपण्यासाठी गेले. कुटुंबिय दुसऱ्या खोलीत झोपी गेले. रात्री दिडच्या दरम्यान राज यांच्या बेडरूम मधून उलट्या होत असलेला आवाज राज यांच्या वडिलांना ऐकू येऊ लागला. त्यामुळे वडिलांनी त्यांच्या बेडरूमकडे धाव घेतली. बेडरूमचा दरवाजा उघडून त्यांनी आत मध्ये प्रवेश केला असता त्यांना राज आणि ऋतुजा हे कोणतेतरी शेती विषारी औषध प्राशन करून बेशुध्द अवस्थेत असल्याचे दिसून आले. कुटुंबियांनी तातडीने या दोघांनाही खाजगी वाहनातून तासगांवातील डॉ. जाधव हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल केले. तेथे डॉक्टरांनी तासगांव ग्रामीण रूग्णालय येथे नेण्याचा सल्ला दिला. त्यामुळे तातडीने या दोघांनाही ग्रामीण रुग्णालय येथे दाखल करण्यात आले.

‘तुला जिवंत सोडत नाही…’, पैसे मागणाऱ्या डेअरी चालकावर शेजाऱ्याकडून जीवघेणा हल्ला

तिथे उपचारापूर्वीच डॉक्टरांनी ते दोघे मयत झाल्याचे सांगितले. घटनेचे वृत्त समजताच तासगांव पोलीसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन घटनास्थळाचा पंचनामा केला आहे. या दोघांनी एवढ्या टोकाचे पाऊल का उचलले ते समजू शकले नाही, या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात