JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / घाटकोपरमधील दाम्पत्याच्या मृत्यूबाबत मोठी अपडेट समोर; घटनेपूर्वी 6 तास होते गायब?

घाटकोपरमधील दाम्पत्याच्या मृत्यूबाबत मोठी अपडेट समोर; घटनेपूर्वी 6 तास होते गायब?

तपासादरम्यान एक वेगळीच माहिती समोर आली आहे. मृत्यूपूर्वी हे जोडपे सहा तास गायब असल्याचा दावा पोलिसांकडून करण्यात आला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 10 मार्च : मुंबईतल्या घाटकोपरमध्ये एका नवविवाहित दाम्पत्याचा मृतदेह बुधवारी बाथरूममध्ये आढळल्यानं खळबळ उडाली होती. गीझर गॅस लीकमुळे त्यांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे. दीपक शाह आणि टीना शाह असं या दाप्मत्याचं नाव आहे. दीपक शाह आणि टीना शाह हे कुकरेजा टॉवरमध्ये भाड्याने राहत होते. शाह यांच्या घरी कामासाठी येणाऱ्या महिलेनं बेल वाजवली. मात्र कुणीही दरवाजा न उघडल्यानं पोलिसांना बोलावण्यात आले. पोलिसांनी डुप्लिकेट चावीने दरवाजा उघडल्यानंतर दोघेही बाथरूममध्ये बेशुद्धावस्थेत पडले होते. त्यांना रुग्णालयात नेण्यात आले, पण डॉक्टरांनी दोघांनाही तपासून मृत घोषित केले. या प्रकरणात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे, मात्र आता नवीन माहिती समोर येत आहे. नवी माहिती समोर या प्रकरणाचा तपास सध्या पंतनगर पोलीस करत आहेत. तपासादरम्यान एक वेगळीच माहिती समोर आली आहे. मृत्यूपूर्वी हे जोडपे सहा तास गायब असल्याचा दावा पोलिसांकडून करण्यात आला आहे. मंगळवारी दुपारी 3.30 च्या सुमारास या जोडप्याला त्यांच्या घरापासून 200 मिटर अंतरावर असलेल्या चेड्डा नगर जंक्शनवर पहाण्यात आलं होतं. मात्र त्यानंतर ते घरी रात्री साडेनऊ वाजता पोहचल्याची माहिती सुरक्षारक्षकाने दिली. ज्यावेळी ते घरी परतले तेव्हा त्यांनी मद्यपान केलं नव्हतं असंही सुरक्षा रक्षकाने म्हटलं आहे. मित्रांनीच केला विश्वासघात; मैत्रिणीला मोबाईल देण्याचं आमिष दाखवलं अन्.., सामूहिक बलात्काराच्या घटनेनं खळबळ पोलिसांकडून तपास त्यामुळे आता मंगळवारी दुपारी 3.30 ते रात्री साडेनऊच्या दराम्यान हे दाम्पत्य नेमकं कुठं होतं याचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे. या प्रकरणाला यातून वेगळ वळण लागण्याची देखील शक्यता आहे. मात्र सध्या तरी गीझर गॅस लीकमुळेच त्यांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून वर्तवण्यात आला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या