जाहिरात
मराठी बातम्या / क्राइम / मित्रांनीच केला विश्वासघात; मैत्रिणीला मोबाईल देण्याचं आमिष दाखवलं अन्.., सामूहिक बलात्काराच्या घटनेनं खळबळ

मित्रांनीच केला विश्वासघात; मैत्रिणीला मोबाईल देण्याचं आमिष दाखवलं अन्.., सामूहिक बलात्काराच्या घटनेनं खळबळ

सामूहिक बलात्काराच्या घटनेनं खळबळ

सामूहिक बलात्काराच्या घटनेनं खळबळ

या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांचा तपास सुरू आहे. आतापर्यंत या प्रकरणातील दोन आरोपींची ओळख पटवण्यात यश आलं आहे.

  • -MIN READ Bangalore,Bangalore,Karnataka
  • Last Updated :

बंगळुरू, 10 मार्च : एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मोबाईल देण्याचं आमिष दाखवून एका अल्पवयीन मुलीवर चार जणांनी सामूहिक अत्याचार केल्याची घटना समोर आल्यानं खळबळ उडाली आहे. चार जणांनी या मुलीवर बलात्कार केला. चारपैकी दोन जण पीडितेचे मित्र होते. यापैकी दोन आरोपींची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आलं आहे. तर अन्य दोन आरोपींची ओळख पटवणे अद्याप बाकी आहे. आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. मोबाईलचं आमिष घटनेबाबत अधिक माहिती अशी की ही घटना कर्नाटकमधील हुबळी जिल्ह्यातील आहे. आरोपींपैकी दोन जण या मुलीचे मित्र होते. या मुलीला मोबाईल देण्याचे आमिष दाखवून तिच्यावर सामूहिक अत्याचार करण्यात आला. सुरुवातीला तिच्या मित्राने तिला घरी बोलावलं. पीडिता घरी आल्यानंतर तिला दुचाकीवर बसून हुबळी रिंगरोड परिसरातील एका निर्जळ ठिकाणी नेऊन तिच्यावर बलात्कार करण्यात आला. यावेळी आरोपींनी पीडितेला मारहाण केल्याची माहिती देखील समोर येत आहे. मोठी बातमी! शिवज्योत घेऊन निघालेल्या शिवभक्तांच्या टेम्पोचा भीषण अपघात; 35 जखमी गुन्हा दाखल या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांचा तपास सुरू आहे. आतापर्यंत या प्रकरणातील दोन आरोपींची ओळख पटवण्यात यश आलं आहे, तर अन्य दोन आरोपींची ओळख पटवण्याचा प्रयत्न सुरू आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात