JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / 'मी घरी बसून...' टीकेवर उद्धव ठाकरेंची सगळ्यात मोठी प्रतिक्रिया

'मी घरी बसून...' टीकेवर उद्धव ठाकरेंची सगळ्यात मोठी प्रतिक्रिया

महाविकासआघाडीच्या बैठकीनंतर उद्धव ठाकरे यांनी तीनही पक्षांच्या कार्यकर्त्यांना संबोधित केलं, यावेळी ठाकरेंनी त्यांच्यावर होत असलेल्या टीकेवर प्रत्युत्तर दिलं.

जाहिरात

उद्धव ठाकरेंचा शिंदे-भाजपवर निशाणा

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 15 मार्च : महाविकासआघाडीच्या बैठकीनंतर उद्धव ठाकरे यांनी तीनही पक्षांच्या कार्यकर्त्यांना संबोधित केलं, यावेळी ठाकरेंनी त्यांच्यावर होत असलेल्या टीकेवर प्रत्युत्तर दिलं. माझ्यावर नेहमी आरोप केले जातात, कारण तेव्हा परिस्थितीत तशीच होती. याने घरी बसून सरकार चालवलं. त्यावेळी परिस्थितीत तशीच होती, त्यामुळे घरी बसून सरकार चालवलं. मी घरी बसून जे केलं, ते सूरत-गुवाहाटीला जाऊन जमलं नाही, असं प्रत्युत्तर उद्धव ठाकरे यांनी दिलं आहे. तसंच ज्यांना थांबायचं आहे त्यांनी थांबावं, ज्यांना जायचं आहे त्यांनी निघा, असंही उद्धव ठाकरे म्हणाले. मला अनेक जण विचारतात, तुम्हाला कळलं नाही का, हो मला कळलं होतं, मी त्यांना कशाला थांबवू, जे विकले गेलेले आहे. त्यांना सोबत घेऊन कसं लढणार. विकलेल्या माणसांना सोबत घेऊन लढू शकतो. मी दार उघडं ठेवलं होतं. ज्यांना लढायचं आहे, त्यांनी थांबावं, बाकीच्या लोकांन निघून जावं. कारण, ते शिवसैनिक असू शकत नाही. अशी लाचारी मी पत्कारली नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले. पंचामृत कुणी लस्सीसारखं पित नाही, प्रत्येकाला थोडं थोडं द्यायचं आणि ते पंचामृत पिऊन डोक्यावरून हात फिरवायचा. पंचामृतातले काही शिंतोडे मिळाले तरी मिळवलं, असा टोला उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या अर्थसंकल्पावर लगावला. महाशक्ती मागे असेल तर पेन्शन देण्यात काय अडचण आहे? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी विचारला आहे.

एक तर भाजपमध्ये किंवा तुरुंगात अशी सध्याची स्थिती आहे, न्यायदेवता लोकशाहीचं वस्त्रहरण होऊ देणार नाही, असा विश्वासही उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. अटलबिहारी वाजपेयींचं सरकार सेक्युलर चेहरा घेऊन आलं होतं, तेव्हा ममता बॅनर्जींचा पाठिंबा घेतला होता, तेव्हा हिंदुत्व सोडलं होतं का? काँग्रेससोबत जाऊन आम्ही हिंदुत्व सोडलं असेल तर काश्मीरमध्ये मुफ्तींसोबत जाऊन तुम्ही काय केलं? असा निशाणाही उद्धव ठाकरेंनी भाजपला लगावला. आता म्हणे, गतीमान सरकार अशी जाहिरातबाजी सुरू आहे. महिलांना 50 टक्के सवलत दिली आहे. पण त्या महिलांचे घर कसे चालणार याबद्दल कोणताही खुलासा नाही. ती लोक फक्त धुके निर्माण करतात. काही तरी वाद निर्माण करायचे, आपली पोळी भाजून घ्यायची, असे यांचे धंदे आहेत, अशी टीका उद्धव ठाकरेंनी दिली. कोरोना काळात काय भ्रष्टाचार केला, आव्हान देतो एक तरी भ्रष्टाचार काढून दाखवा. मला समाधान आहे, कोरोना काळात काम केलं पण एका मृतदेहाची विटंबना होऊ दिली नाही. फार विदारक दृश्य होतं, गंगेत प्रेतं वाहत होती. पण महाराष्ट्रात असं होऊ दिलं नाही, असं विधानही उद्धव ठाकरेंनी केलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या