JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Shekhar Nikam : 'कॉलवर पवारांशी बोलू शकलो नाही..' बंडखोर आमदाराची प्रतिक्रिया म्हणाले 'पण आता मागे..'

Shekhar Nikam : 'कॉलवर पवारांशी बोलू शकलो नाही..' बंडखोर आमदाराची प्रतिक्रिया म्हणाले 'पण आता मागे..'

Maharashtra NCP Crisis : अजित पवार यांच्यासोबत बंडामध्ये सहभागी झालेल्या आमदारांना आता संपर्क करण्याचं काम सुरू आहे. दरम्यान, चिपळूणचे आमदार शेखर निकम यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

जाहिरात

बंडखोर आमदाराची प्रतिक्रिया

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

सचिन सावंत, प्रतिनिधी रत्नागिरी, 3 जुलै : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्याने राज्यात खळबळ उडाली आहे. विधानसभेचे सदस्य अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या 9 आमदारांनी रविवारी दुपारी राजभवनावर मंत्रिपदाची शपथ घेतली. यावेळी बहुसंख्य आमदार आमच्यासोबत असल्याचा दावा अजित पवार यांनी केला आहे. तर शपथविधीसाठी उपस्थित असलेल्या आमदारांनी आमच्याशी संपर्क केल्याचा दावा राष्ट्रवादीकडून केला जात आहे. अशात अजित पवार यांच्या सोबत गेलेले चिपळूणचे आमदार शेखर निकम यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. काय म्हणाले आमदार शेखर निकम? आमदार शेखर निकम यांनी आपली कोंडी झाल्याचे बोलताना सांगितले. ते म्हणाले, “रात्री 11 वाजता फोन आला आणि सर्व आमदारांना बोलावण्यात आले. बैठकीला सर्व नेतेमंडळी तिथे होती. अजित पवार आणि सुप्रिया सुळे चर्चा करत होते. दादांना मी आपल्यासोबत राहीन असा शब्द दिला होता. म्हणून मी मागे फिरलो नाही. काळजावर दगड ठेऊन मी निर्णय घेतला आहे. राजकारण सोडलेले बरे अशी माझी मानसिकता झाली आहे. दादांनी मला अडचणीवेळी कायम मदत केली आहे. यापूर्वी दादांनी मला 5-5 वेळा कॉल केले होते. पण मी गेलो नाही. पण यावेळी मी दादांना मी शब्द दिला. मला शरद पवा र, सुप्रिया सुळे, रोहित पवार यांचा कॉल आला होता. कॉल आल्यानंतर मी शरद पवार साहेबांशी बोलू शकलो नाही. यापूर्वी दादांनी मदत केली. शरद पवार यांची मनापासून माफी मागायची आहे. अशावेळी आमच्यासारख्या लहान माणसाचे खूप हाल होतात. आता परिणामांची पर्वा नाही. मी अजित पवार यांच्यासोबत असून जे होईल ते होईल. घर फोडले तरी रुपया मिळणार नाही. ईडीचा विषय नाही. मी पदासाठी गेलो नाही. अजित पवार यांच्यासोबत असलेले संबंध आणि दिलेला शब्द यामुळे मी गेलो, अशी प्रतिक्रिया शेखर निकम यांनी दिली आहे. वाचा - आता खरी लढाई सुरू? राष्ट्रवादीचे दोन्ही गट विधीमंडळाकडे; खरा पक्ष कोणाचा? अध्यक्षांसमोर आव्हान अजित पवार यांच्यासोबत मंत्रीमंडळात कोणी शपथ घेतली? अजित पवार यांच्यासोबत मंत्रिपदाची शपथ घेतलेल्यांमध्ये छगन चंद्रकांत भुजबळ, दिलीप दत्तात्रय वळसे- पाटील, हसन मियालाल मुश्रीफ, धनंजय पंडितराव मुंडे, धर्मरावबाबा भगवंतराव आत्राम, आदिती सुनील तटकरे, संजय बाबूराव बनसोडे, अनिल भाईदास पाटील यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. शरद पवार लवकरच राज्यव्यापी दौरा करणार पक्षात फूट पडल्यानंतर शरद पवार लवकरच राज्यव्यापी दौरा करणार आहेत. पहिली सभा दिलीप वळसे पाटील यांच्या मतदारसंघात घेणार असून दुसरी सभा धनंजय मुंडे यांच्या परळी मतदारसंघात घेणार असल्याची माहिती आहे. या दौऱ्याची सुरुवात शिवनेरीपासून करणार असून शेवट रायगडवर करणार करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या