JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / MNS Update : ठाकरे बंधू एकत्र येणार? मनसेच्या नेत्याचा त्या प्रस्तावावर मोठा खुलासा

MNS Update : ठाकरे बंधू एकत्र येणार? मनसेच्या नेत्याचा त्या प्रस्तावावर मोठा खुलासा

अभिजित पानसे यांनी संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. याशिवाय ते सध्याच्या राजकारणावरही बोलले.

जाहिरात

ठाकरे बंधू

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई : अभिजित पानसे आणि संजय राऊत गाडीतून एकत्र उद्धव ठाकरे यांच्याकडे गेल्यामुळे युतीच्या चर्चांना उधाण आलं. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येऊन मोर्चेबांधणी करणार का तसा प्रस्ताव मनसेकडून देण्यात आला आहे का याबाबतही अनेक चर्चा रंगल्या. अभिजित पानसे यांनी संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. याशिवाय ते सध्याच्या राजकारणावरही बोलले. युतीच्या प्रस्तावावर काय म्हणाले? माझ्या वैयक्तीक संबंधांमुळे भेटलो, ते सामनात आले म्हणून तिथे भेटलो. मी प्रस्ताव घेऊन गेलो नव्हतो. तसा कोणताही प्रस्ताव नाही. साहेबांसोबतची आणि माझी भेट आधीच ठरली होती त्यामुळे मी इथे आलो. पण मी युतीबाबतचा कोणताही प्रस्ताव नेला नाही. प्रस्तावावर कोणतीही चर्चा झाली नाही. मात्र गदारोळ घातलाय, जो घोडबाजार केला त्यावर चर्चा होणं स्वाभाविक आहे.

Ajit Pawar : धाराशिव जावईबापूंच्याच बाजूने; सासरवाडीत झळकले दादांचे पोस्टर

अभिजित पानसे

पुढे काय घडेल हे सांगायला मी ज्योतिषी नाही. मनापासून माझी भावना आहे, की हे महाराष्ट्राला पटतंय जे काय चालू आहे ते. राज ठाकरेंच्या मागे आता मराठी माणसाने ठामपणे उभं राहायला हवं. आयुष्यभर वैरी असलेले एकत्र येऊ शकतात. तर मग हे का नाही, पण आता तरी यावर मी बोलू शकत नाही. याआधी काही वर्षांपूर्वी हा प्रस्ताव दिला होता. मात्र तो स्वीकारला नाही.

शरद पवार अॅक्शन मोडमध्ये, दिल्लीतल्या बैठकीत मोठे निर्णय होणार?

संबंधित बातम्या

ठाकरे बंधू एकत्र येणार का? राज ठाकरेंनी आतापर्यंत दिलेली जबाबदारी मी पार पाडली आहे. यापुढे जर ती जबाबदारी दिली तर ती पार पाडेन. जर युतीच्या प्रस्तावत मध्यस्त म्हणून जबाबदारी पार पाडायची वेळ आली तर त्यावरही विचार करेन अशी सकारात्मक प्रतिक्रिया अभिजित पानसे यांनी दिली आहे. मात्र प्रत्यक्षात अभिजित पानसे यांनी ठाकरे बंधू एकत्र येणार का किंवा भविष्यात तसा काही विचार होईल का यावर थेट उत्तर देणं टाळलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या