JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Latur News: बांगड्यातही लातूर पॅटर्न, अवघ्या 10 रुपयांपासून मिळतो सेट, असं मार्केट पाहिलंय कधी? Video

Latur News: बांगड्यातही लातूर पॅटर्न, अवघ्या 10 रुपयांपासून मिळतो सेट, असं मार्केट पाहिलंय कधी? Video

लातूरमधील गंजगोलाई परिसरात बांगड्यांचे होलसेल मार्केट आहे. इथे अगदी 10 रुपयांपासून बांगड्या मिळतात.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

  ऋषिकेश होळीकर, प्रतिनिधी लातूर, 15 मे: लग्न समारंभ असो की कुठलाही कार्यक्रम त्यात आवर्जून मागणी होते ती मॅचिंग बांगड्यांची. भारतात अनेक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीच्या बांगड्या बनवल्या व विकल्या जातात. या बांगड्यांचे स्वतंत्र वैशिष्ट्य असून त्यातील वेगवेगळ्या डिझाईन, रंगसंगती, बांगड्या तयार होण्याच्या शैली, मटेरियल यात भिन्नता आढळते. भारतीयांमध्ये सोन्या-चांदीच्या दागिन्यांची आवड असतानाच काचेच्या बांगड्यांची मागणी आजही बाजारात मोठ्याप्रमाणावर होत असते. अशाच बांगड्यांची मोठी बाजारपेठ लातूरमधील गंजगोलाई भागात आहे. काय आहे किंमत? लातूर गंजगोलाई बाजारपेठ किरकोळ आणि होलसेल भावात सर्व प्रकारच्या बांगड्या खरेदी करण्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. 10 रुपये डझन पासून ते अगदी 1 हजार रुपयांच्या सेटपर्यंत सर्व प्रकारच्या बांगड्या येथे उपलब्ध आहेत. केवळ लातूर नव्हे तर लातूरच्या परिघातील अनेक लोक येथे बांगड्यांची खरेदी करण्यासाठी येत असतात.

कोणत्या बांगड्यांना मागणी? महाराष्ट्रात आजही लग्न समारंभात बांगड्या भरण्याच्या कार्यक्रम होत असतो. या कार्यक्रमात विशेषतः हिरव्या काचेच्या बांगड्याना विशेष मागणी असते. काळानुरूप बांगड्यांचा प्रकार आणि मागणी मध्ये देखील बदल झाला आहे. त्यात विशेष म्हणजे दुल्हन सेट, कंगन, मॅचिंग सेट, जयपुरी सेट, स्टोन बँगल्स, लटकन इत्यादी सारख्या प्रकारची मोठी मागणी सध्या आहे. कर्नाटक राज्यातून येतात ग्राहक लातूर शहरातील गंजगोलाई व बस स्टँडच्या पाठीमागील भागात ही मोठी बाजारपेठ आहे. या ठिकाणी केवळ लातूरच नाही तर बाजूच्या कर्नाटकातील व्यापरी देखील होलसेल दरात माल खरेदीसाठी येत असतात. कुरीयरच्या माध्यमातून देखील अनेक ठिकाणी माल पाठवला जातो. आमच्या दुकानात काचेच्या बांगड्या 10 रुपये डझन पासून ते 500 रुपये पर्यंत चांगल्यात चांगला बांगडी सेट आहे. सर्वात महाग सेट म्हणजे 5-6 हजार पर्यंत दुल्हन सेट आहे, असे बांगडी विक्रते जावेद मणियार यांनी सांगितले. जुनं ते सोनं, महिला बनवतायंत जात्यावर डाळ, वर्षाला लाखोंची उलाढाल, Video उत्तर भारतातून येतो माल आपल्याला हव्या त्या पद्धतीची बांगडी आमच्या दुकानात उपलब्ध आहे. सध्या आगामी काळात लग्न समारंभ सुरू होणार असल्याने काचेच्या बांगड्यानां चांगली मागणी आहे. लातूर या बाजारात जयपूर, फिरोजाबाद, दिल्ली, इंदोर, भोपाल इत्यादी ठिकाणाहून बांगड्यांचा माल येत असतो. सर्व प्रकारच्या बांगड्या या बाजारात ग्राहकांसाठी अल्प दरात उपलब्ध आहेत. त्यामुळे येथे वर्षभर बांगड्या खरेदी करणाऱ्यांची गर्दी बघायला मिळते, अशी माहिती सुहाना बँगल स्टोअर येथील विक्रेते मणियार यांनी दिली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या