JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / ज्याला लहानाचं मोठं केलं, त्यानेच घरात पाडला आई-वडिलांच्या रक्ताचा सडा, कोल्हापूर हादरलं

ज्याला लहानाचं मोठं केलं, त्यानेच घरात पाडला आई-वडिलांच्या रक्ताचा सडा, कोल्हापूर हादरलं

जिल्ह्यातील आजरा तालुक्यातील बहिरेवाडी इथं ही घटना घडली आहे. सचिन गोरुले असं हत्या करणाऱ्या मुलाचे नाव आहे

जाहिरात

जिल्ह्यातील आजरा तालुक्यातील बहिरेवाडी इथं ही घटना घडली आहे. सचिन गोरुले असं हत्या करणाऱ्या मुलाचे नाव आहे

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

ज्ञानेश्वर साळुंखे, प्रतिनिधी कोल्हापूर, 11 फेब्रुवारी : उतार वयामध्ये मुलगा हा आई-वडिलांची काठी असतो. पण, कोल्हापूरमध्ये एका मुलाने आई आणि वडिलांची निर्घृणपणे हत्या केल्याची घटना कोल्हापुरात घडली आहे. या घटनेमुळे आजरा तालुक्यासह बहिरेवाडी मध्ये खळबळ उडाली आहे. मुलगा हा मनोरुग्ण असल्याचे सांगितले जात आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील आजरा तालुक्यातील बहिरेवाडी इथं ही घटना घडली आहे. सचिन गोरुले असं हत्या करणाऱ्या मुलाचे नाव आहे. कृष्णा बाबू गोरुले (वय 60) आणि मुलगा सचिन (वय 32) यांच्यामध्ये कुठल्या तरी कारणावरून जोरदार वादावादी झाली होती. त्यामुळे रागाच्या भरात सचिनने वडिल कृष्णा यांना बेदम मारहाण केली. या मारहाणीत त्यांचा मृत्यू झाला. आई पारूबाई गोरूलेने सचिनला आवरण्याचा प्रयत्न केला. पण त्याने तिलाही मारहाण केली. (Ram Mandir Ayodhya : प्रेयसीच्या भावाला अडकवण्यासाठी राम मंदिर उडवण्याची दिली धमकी, अखेर असा झाला शेवट) वडिलांचा मृत्यू झाल्यानंतर सचिन याने स्वतःला एका खोलीमध्ये कोंडून घेतले होते. आई पारुबाई या घटनास्थळी जखमी अवस्थेत तळमळत होती, तिच्यावरही सत्तूरने वार त्या गंभीर जखमी अवस्थेत होते. शेजाऱ्यांना आरडाओरड करण्याचा आवाज आला असता सगळा प्रकार समोर आला. तातडीने पारूबाईंना गडहिंग्लज येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले त्यावेळी त्यांचा उपचारदर दरम्यान मृत्यू झाला. (हे ही वाचा :  पुण्यातील कोयता गँगनंतर मालेगावात तलवार गँगचा धुमाकूळ; घटना सीसीटीव्हीत कैद ) घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील हारुगडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पुढील तपास सुरू केला आहे. सचिन हा गेली चार वर्षे मानसिक दृष्ट्या संतुलन बिघडलेल्या अवस्थेत असल्याचे बहिरेवाडी ग्रामस्थांकडून सांगण्यात आलं. या प्रकरणी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या