अहमदनगर, 11 फेब्रुवारी : अहमदनगरमध्ये एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. मागच्या 8 दिवसांपूर्वी राम जन्मभूमी मंदीर बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीचा फोन आला होता. यावरून एका व्यक्तीसह त्याच्या पत्नीला पोलिसांनी अटक केली आहे. 2 फेब्रुवारी 2023 रोजी पोलिसांनी पहाटे 5 च्या सुमारास हा धमकी फोन आला होता. राम जन्मभूमी परिसरात राहणाऱ्या मनोज कुमार या व्यक्तीला हा फोन आला होता. याबाबत आयोध्या पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
याबाबत आयोध्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आपल्या गर्लफ्रेंडच्या भावाला अडकवण्यासाठी त्याच्या मोबाइल नंबरवरून नेट कॉलिंग करत राम मंदिर उडवण्याची धमकी दिली होती. याबाबत अयोध्यातील सर्कल अधिकारी एस के गौतम म्हणाले की, मनोज कुमारकडे ज्या क्रमांकावरून फोन आला सर्व्हिलांसच्या मदतीने त्याची चौकशी करण्यात आली. त्यात अनिल रामदास घोडके उर्फ बाबा जान मूसा नामक व्यक्तीने दिल्लीच्या बिलालला फसवण्याच्या हेतूने नेट कॉलिंग करून त्याच्या नावाने धमकी दिल्याचे तपासात उघड झाले.
हे ही वाचा : पुण्यातील कोयता गँगनंतर मालेगावात तलवार गँगचा धुमाकूळ; घटना सीसीटीव्हीत कैद
पोलिस पथकाने अनिल रामदास घोडके व त्याची पत्नी जार्ड संतन शाणी एश्वेरा उर्फ आयरन सॅटर्न हेल या दोघांना अहमदनगरच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या भागातून अटक केली आहे. पकडण्यात आलेले आरोपी सातत्याने पोलिसांची दिशाभूल करत होते. स्वतःला कधी चेन्नई तर कधी महाराष्ट्राचे रहिवाशी असल्याची चुकीची माहिती देत होते.
पोलीस अधिकारी मधूबन सिंह म्हणाले की, मनोज कुमार यांच्या फोनवर पहाटे 5 च्या सुमारास एका अज्ञात क्रमांकावरून फोन आला. मनोज यांनी त्यांना तुम्ही कोण व कुठून बोलत आहात? असे विचारले असता त्यांनी आपण दिल्लीहून बोलत असल्याचे सांगितले. आज सकाळी 10 वाजेपर्यंत राम जन्मभूमी उडवण्यात येईल अशी धमकीही त्याने दिली होती.
हे ही वाचा : नेहमीचा शर्ट घातला नाही, बैलाने मालकालाच फेकले उचलून अन् छातीवर राहिला उभा, जागीच मृत्यू
दरम्यान आरोपी मनोज कुमारकडे 9 मोबाइल फोन, लॅपटॉप, 2 कुराण, 2 मुस्लीम टोप्या, आधार कार्ड, पॅन कार्ड, एटीएम कार्ड, चेक बूक, बर्थ सर्टिफिकेट, इलेक्शन कमिशनचे 2 साधे फॉर्म, सुधारित आधार कार्ड, ताबीज मालासह अनेक आक्षेपार्ह सामग्री जप्त करण्यात आली आहे. अधिकारी गौतम यांच्या माहितीनुसार, अनिल रामदास घोडके याने यापूर्वीही अशा प्रकारचे बेकायदा कृत्य केले होते. त्याने रामजन्मभूमीसह दिल्ली मेट्रो स्टेशनही बॉम्बने उडवण्याची धमकी दिली होती.