JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Kolhapur News : पावसाची होणार लवकरच एन्ट्री, शेतकऱ्यांनो अशी घ्या काळजी, पाहा Video

Kolhapur News : पावसाची होणार लवकरच एन्ट्री, शेतकऱ्यांनो अशी घ्या काळजी, पाहा Video

पावसाची लवकरच एन्ट्री होणार असून शेतकऱ्यांनी काळजी कशी घ्यावी या संदर्भात कृषी विभागाने महत्त्वाच्या टीप्स दिल्या आहेत.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

साईप्रसाद महेंद्रकर, प्रतिनिधी कोल्हापूर, 03 जून : जून महिना सुरू झाल्याने शेतकऱ्यांसह सामान्य नागरिकांना प्रतीक्षा लागून राहिली आहे ती मान्सूनच्या आगमनाची. त्यातच आता दिनांक 3 ते 7 जून दरम्यान आकाश सामान्यतः ढगाळ राहण्याची तसेच तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची देखील शक्यता भारतीय हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे. दरम्यान या काळात कोल्हापुरच्या ग्रामीण कृषी मौसम सेवा केंद्राकडून शेतकऱ्यांसाठी काही सूचनाही करण्यात आल्या आहेत. कसे असेल हवामान ? प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई यांच्याकडून प्राप्त झालेल्या हवामान अंदाजानुसार कोल्हापूर, सांगली आणि सातारा या जिल्ह्यांमध्ये दिनांक 3 ते 7 जून दरम्यान कमाल तापमान अनुक्रमे 36° ते 37°, 38° ते 40° आणि 38° ते 40° तसेच किमान तापमान हे अनुक्रमे 23° ते 25°, 21° ते 24°, 23° ते 25° सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यामध्ये अनुक्रमे वाऱ्याचा वेग ताशी 15 ते 17 किमी पर्यंत, 18 ते 20 किमी आणि 13 ते 21 किमी दरम्यान राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.

दरम्यान तुरळक काही ठिकाणी मेघ गर्जना, विजांचा कडकडाट आणि ताशी 30 ते 40 किमी इतक्या वेगाच्या वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी बंधूनी स्वतःची आणि आपल्या पशुधनाची काळजी घ्यावी, असे आवाहन देखील करण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी अशी घ्या काळजी शेतकरी बांधवांनी मेघ गर्जना आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता असल्याने पुढीलप्रमाणे काळजी घ्यावी. 1) मेघ गर्जना, विजांचा कडकडाट आणि जोरदार वाऱ्याची शक्यता असल्याने नवीन लागवड केलेल्या फळबागांना तसेच भाजीपाला पिकांना जोरदार वाऱ्यामुळे झाडे पडू नयेत, म्हणून काठी/बांबूच्या साहाय्याने आधार द्यावा. 2) शेतामध्ये काम करत असल्यास त्वरित सुरक्षित ठिकाणी जावे. झाडाखाली थांबणे टाळावे. 3) जनावरे तलाव, नदी किंवा इतर पाण्याच्या ठिकाणी असतील, तर त्यांना त्वरित बाहेर काढून सुरक्षित ठिकाणी ठेवावे. 4) जनावरे ट्रॅक्टर किंवा इतर धातूंच्या वस्तूपासून लांब बांधावीत. 5) वाहने झाडाखाली उभी करू नयेत. 6) काढणी केलेला शेतीमाल प्लास्टिकच्या शीटने झाकावा. 7) विद्युत उपकरणे विद्युत तारा यांचा संपर्क टाळावा. 8) जनावरांना झाडाखाली जमा होऊ देऊ नये. Jalna News : शेतकऱ्यांनो, बियाणे आणि खत खरेदी करताना फसवणूक टाळण्यासाठी करा ‘हे’ काम, कृषी विभागानं दिला महत्वाचा सल्ला Video या पिकांची घ्या काळजी भात - खरीप हंगामामध्ये भाताची लागवड करण्यासाठी रोपवाटिका तयार करणेकारिता गादी वाफे तयार करून घ्यावेत. पेरणीसाठी 1 मी. रुंदीचे 15 सेमी उंचीचे आणि आवश्यकतेनुसार लांबीचे गादीवाफे तयार करावेत. हेक्टर क्षेत्रावर भात लागवडीसाठी 10 गुंठे क्षेत्रावरील रोपवाटिका पुरेशी होते. तर वाफे तयार करताना गुंठा क्षेत्रास 250 किलो शेणखत किंवा कंपोस्ट खताबरोबर 500 ग्रॅम नत्र, 400 ग्रॅम स्फुरद व 500 ग्रॅम पालाश हि खते चांगल्या प्रकारे मातीत मिसळावीत. तसेच भात लागवडीसाठी पुढील वाणांची निवड करावी :-• हळवा : कर्जत-184, रत्नागिरी-1, कर्जत-4, फुले राधा• निमगरवा : फुले समृद्धी• गरवा : रत्नागिरी-2, कर्जत-2• सुवासिक वाण : बासमती 370 इंद्रायणी, भोगावती, सुगंधा• संकरीत : सह्याद्री-1, सह्याद्री-4, सह्याद्री-5 पाण्याचा खात्रीशीर स्रोत उपलब्ध असल्यासच भात रोपवाटिका तयार करण्यास सुरुवात करावी. मका - जमीन - उत्तम निचरा असलेली जमीन निवडावी. विशेष रेतीयुक्त, खोल, मध्यम ते भारी, नदीकाठची, गाळाची जमीन असल्यास उत्तम. पूर्वमशागतटन शेणखत 12 ते 10 कुळवाच्या पाळ्या देऊन 3 ते 2 एक खोल नांगरट कंपोस्ट खत प्रती हेक्टरी याचवेळी शेतात मिसळून द्यावे. सोयाबीन - खोल नांगरट आणि कुळवाच्या दोन पाळ्या द्याव्यात. शेवटच्या कुळवणी आगोदर प्रती हेक्टरी 5 टन शेणखत मिसळावे. राजमा - जमीन पाण्याचा उत्तम निचरा होणारी मध्यम ते भारी अशी निवडावी. पूर्व मशागत : जमिनीची खोल नांगरट करून घ्यावी आणि  हेक्टरी 5 टन शेणखत/ कंपोस्ट खत द्यावे.

Jalna News : शेतकरी लयभारी, युट्यूबवर व्हिडीओ पाहिला आणि खास बियाणी मागवली, शेतात झाला मोठा चमत्कार VIDEO

संबंधित बातम्या

ऊस - वळवाचा पहिला पाऊस झाल्यावर हुमणीचे भुंगेरे सायंकाळी बाभूळ, कडूनिंब, आणि बोर या झाडांवर जमा होतात. अगोदर मादी भुंगेरे आणि नंतर भुंगेरे जमिनीतून बाहेर पडतात. या झाडांवर बसून ते झाडाचा पाला खातात. अशा झाडांच्या फांद्या रात्री काठीच्या सहाय्याने हलवून खाली पडलेले भुंगेरे गोळा करून रॉकेलमिश्रित पाण्यात टाकून त्यांचा नाश करावा. केळी - बागेमध्ये ओलावा टिकवून ठेवण्यासाठी केळी पाने आणि अवशेष, जुना गव्हाचा भुसा, उसाचे पाचट, सोयाबीन भुसा यांचा वापर करून सेंद्रिय आच्छादन करावे. तर खरीप हंगामामध्ये जनावरांच्या खाद्यासाठी पुढील चारा पिकांची लागवड करावी. • ज्वारी : रुचिरा, फुले अमृता, मालदांडी 35.1, फुले गोधन या वाणांची निवड करावी. • मका : आफ्रिकन टॉल, मांजरी कंपोझिट, विजय, गंगा सफेद-2 या वाणांची निवड करावी • संकरीत नेपियर गवत : फुले जयवंत, फुले गुणवंत या वाणांची निवड करावी. (टीप : वरील सर्व माहिती ग्रामीण कृषी मौसम सेवा ऐएमएफयु कोल्हापूर, विभागीय कृषी संशोधन केंद्र, शेंडा पार्क, कोल्हापूर यांच्याकडून देण्यात आली आहे.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या