JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Rajaram Sakhar Karkhana Result Update : कंडका पडला; सतेज पाटलांना मोठा धक्का, 'राजाराम'मध्ये आप्पा महाडिकांचा विजय

Rajaram Sakhar Karkhana Result Update : कंडका पडला; सतेज पाटलांना मोठा धक्का, 'राजाराम'मध्ये आप्पा महाडिकांचा विजय

कोल्हापूर जिल्ह्यातील राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची आज मतमोजणी होत आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

कोल्हापूर, 25 एप्रिल : अवघ्या राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची आज मतमोजणी होत आहे. दरम्यान या निवडणुकीत माजी आमदार महादेवराव महाडिक आणि काँग्रेस गटनेते आणि आमदार सतेज पाटील हे आमने सामने आले होते. मागच्या 28 वर्षांपासून महाडिक यांच्याकडे असलेल्या सत्तेला सुरूंग लावण्यासाठी  सतेज पाटील यांनी यंदा कंडका पाडायचा अशा टॅगलाईवर चंग बांधला होता.

परंतु या निवडणुकीत 5 फेरी अखेर महाडिकांनी आपली आघाडी कायम ठेवली आहे. याचबरोबर संस्था कडातून महादेवराव महाडिक यांनी 84 मते मिळवत आपला विजय निश्चित केला आहे. सतेज पाटील यांना हा मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे.

मागच्या एक महिन्यांपासून कोल्हापूर जिल्ह्यातील राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची धुमशान सुरू आहे. आज कोल्हापूर येथील रमण मळा येथे या कारखान्याच्या निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यातील मतमोजणीला सुरूवात झाली आहे. तब्बल 700 मतांची आघाडी सत्ताधारी महाडिक गटाने घेतली आहे. ज्या भागातील मतमोजणी झाली आहे. तो महाडिक यांचा बालेकिल्ला समजला जातो.

संबंधित बातम्या

छत्रपती राजाराम कारखाना निवडणुकीच्या मतमोजणीचा पहिला कल हाती आला आहे. यामध्ये माजी आमदार महादेवराव महाडिक आणि आमदार सतेज पाटील गटात प्रचंड चुरस आहे. परंतु पहिल्या टप्प्यातील मतमोजणीनंतर महाडिक गटाने वर्चस्व मिळवलं आहे.

राजाराम निवडणुकीचा पहिला कल हाती, आप्पा महाडिकांची सरशी, बंटी पाटलांना पहिल्या फेरीत धक्का

तसेच संस्था गटातून महादेवराव महाडिक विजयी झाले आहेत. यामध्ये सतेज पाटलांना मोठा धक्का मानला जात आहे.

महादेवराव महाडिक 83 मते 

सचिन पाटील 44

जाहिरात

बाद १

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या