जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / राजाराम निवडणुकीचा पहिला कल हाती, आप्पा महाडिकांची सरशी, बंटी पाटलांना पहिल्या फेरीत धक्का

राजाराम निवडणुकीचा पहिला कल हाती, आप्पा महाडिकांची सरशी, बंटी पाटलांना पहिल्या फेरीत धक्का

राजाराम निवडणुकीचा पहिला कल हाती, आप्पा महाडिकांची सरशी, बंटी पाटलांना पहिल्या फेरीत धक्का

माजी आमदार महादेवराव महाडिक आणि आमदार सतेज पाटील गटात प्रचंड चुरस आहे. परंतु पहिल्या टप्प्यातील मतमोजणीनंतर महाडिक गटाने वर्चस्व मिळवलं आहे.

  • -MIN READ Kolhapur,Maharashtra
  • Last Updated :

कोल्हापूर, 25 एप्रिल : मागच्या एक महिन्यांपासून कोल्हापूर जिल्ह्यातील राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची धुमशान सुरू आहे. दरम्यान आज कोल्हापूर येथील रमण मळा येथे या कारखान्याच्या निवडणुकीची मतमोजणी होणार आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यातील मतमोजणीला सुरूवात झाली आहे. यामध्ये तब्बल 700 मतांची सत्ताधारी महाडिक गटाने घेतली आहे. ज्या भागातील मतमोजणी झाली आहे. तो महाडिक यांचा बालेकिल्ला समजला जातो.

जाहिरात

छत्रपती राजाराम कारखाना निवडणुकीच्या मतमोजणीचा पहिला कल हाती आला आहे. यामध्ये माजी आमदार महादेवराव महाडिक आणि आमदार सतेज पाटील गटात प्रचंड चुरस आहे. परंतु पहिल्या टप्प्यातील मतमोजणीनंतर महाडिक गटाने वर्चस्व मिळवलं आहे.

फडणवीसांनी दुर्लक्ष केलं, संजय राऊत यांनी थेट CBIकडे केली तक्रार

पहिल्या फेरीत सत्ताधारी छत्रपती राजर्षी शाहू सहकारी पॅनेलने आघाडी घेतली आहे. उत्पादक गट क्रं 1 मध्ये    गट क्रमांक 1 पहिल्या फेरी अखेर मतदान आमदार बंटी पाटील गटाच्या पॅनलमधील बेनाडे शालन बाबुराव यांना 2441 मते तर भोसले किरण बाबासो- 2413 मते मिळाली.

News18लोकमत
News18लोकमत

याचबरोबर महाडिक गटाने उमेदवार भोसले विजय वसंत यांना 3244 मते मिळाली तर मगदूम संजय बाळगोंडा यांना 3169 मते मिळाली. यामध्ये तब्बल 700 मतांनी महाडिक गट आघाडीवर आहे.

उत्पादक गट क्रमांक 2 उमेदवार सत्ताधारी महाडिक गट 1)शिवाजी रामा पाटील =. 3198 2)सर्जेराव बाबुराव भंडारे =3173 3)अमल महादेवराव महाडिक =3358

विरोधी बंटी पाटील गट 1)शिवाजी ज्ञानू किबिले =2261 2)दिलीप गणपतराव पाटील =2328 3)अभिजीत सर्जेराव माने =2184

जाहिरात
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात