JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Breaking news : मुंबई पोलीस कट्रोल रूमला खळबजनक माहितीचा फोन; महाराष्ट्र एटीएस अलर्ट मोडवर

Breaking news : मुंबई पोलीस कट्रोल रूमला खळबजनक माहितीचा फोन; महाराष्ट्र एटीएस अलर्ट मोडवर

मुंबईमधून मोठी बातमी समोर आली आहे. मुंबई पोलीस कट्रोल रूमला खळबळजनक माहितीचा फोन आला आहे.

जाहिरात

मुंबई पोलिसांना खळबळजनक माहितीचा फोन

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 23 जुलै, प्रशांत बाग : मुंबईमधून मोठी बातमी समोर आली आहे. मुंबई पोलीस कट्रोल रूमला खळबळजनक माहितीचा फोन आला आहे. काल मध्यरात्री हा  फोन आल्याची माहिती मिळत आहे. मिळत असलेल्या माहितीप्रमाणे फोन करणाऱ्या व्यक्तीचं नाव पांडे असल्याचं समोर आलं आहे. या कॉलचं लोकेशनही मुंबई परिसरातीलच आहे. टँकरमध्ये दहशतवादी असल्याचा दावा   आरडीएक्सनं भरलेला पांढऱ्या रंगाचा एक ट्रँकर मुंबईतून गोव्याच्या दिशेनं जात आहे, अशी माहिती मुंबई पोलिसांच्या कट्रोल रूमला फोन करणाऱ्या या व्यक्तीनं दिली आहे. या टॅंकरमधून दोन पाकिस्तानी दहशतवादी प्रवास करत आहेत, असा दावाही या व्यक्तीनं केला असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. दरम्यान मुंबई पोलिसांनी या फोनची गांभीर्यानं दखल घेतली आहे. महाराष्ट्र एटीएस आणि गोवा पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. पोलीस कट्रोल रूमला फोन करणारी व्यक्ती पोलिसांच्या संपर्कात आहे, पोलिसांकडून आता या व्यक्तीला मिळालेल्या माहितीचा स्त्रोत काय आहे, याची तपासणी सुरू आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या