JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Jalgaon News : मी खडसेंना चहाचं आमंत्रण दिलंय; त्या प्रसंगानंतर गुलाबराव पाटलांनी स्पष्टच सांगितलं!

Jalgaon News : मी खडसेंना चहाचं आमंत्रण दिलंय; त्या प्रसंगानंतर गुलाबराव पाटलांनी स्पष्टच सांगितलं!

आम्ही सोबत नाष्टाही केला आणि मी एकनाथ खडसे यांना चहाचं आमंत्रणही दिल्याचं गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे.

जाहिरात

गुलाबराव पाटलांचं खडसेंना आमंत्रण

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

जळगाव, 25 जून, नितीन नांदूरकर : एकोंमकांचे कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी असलेले शिंदे गटाचे मंत्री  गुलाबराव पाटील आणि राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे या दोन्ही नेत्यांनी एकाच विवाह सोहळ्याला हजेरी लावली. मात्र विवाह सोहळ्यातही दोन्ही नेत्यांमध्ये दुरावाच असल्याचं दिसून आलं. याबाबत गुलाबराव पाटील यांना विचारले असता त्यांनी मात्र तसं काही नसल्याचं म्हटलं आहे. आमची दुरी केवळ विचारांची आहे, आम्ही बोललो एवढंच नाही तर आम्ही सोबत नाष्टाही केला असं गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे. नेमकं काय म्हणाले गुलाबराव पाटील?  गुलाबराव पाटील आणि एकनाथ खडसे यांनी एकाच विवाहसोहळ्याला हजेरी लावली. मात्र या दोन नेत्यांमधील दुरावा कायम असल्याचं जाणवलं. याबाबत गुलाबराव पाटील यांना विचारले असता, आमची दुरी केवळ विचारांची आहे, आम्ही बोललो एवढंच नाही तर आम्ही सोबत नाष्टाही केला. मी त्यांना चहाचं आमंत्रण दिलं असं गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे. Political news : सोलापूरमध्ये भाजपला मोठा धक्का; शेकडो कार्यकर्त्यांचा ठाकरे गटात प्रवेश खडसेंवर निशाणा  दरम्यान शासन आपल्या दारी या योजनेला राष्ट्रवादीकडून विरोध होत आहे. शासन आपल्या दारी या कार्यक्रमात लोकांना सक्तीने बोलावलं जात असल्याची टीका खडसेंनी केली होती. याला देखील गुलाबराव पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. लाभधारकांना बोलवणं याला सक्ती म्हणत नाहीत, अशा शब्दात पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी एकनाथ खडसेंना प्रत्युत्तर दिलं आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की, लाभार्थ्यांना जागृत करून आम्ही या कार्यक्रमात आणत आहोत. खडसेंच्या म्हणण्याला काहीच अर्थ नाही, असे कार्यक्रम यापूर्वी कोणत्याच सरकारने राबवले नाहीत. त्यामुळे त्यांनी अशा कार्यक्रमाला साथ द्यायला हवी असं गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या