JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Breaking news : राजारामबापू सहकारी बँकेवर ईडीचा छापा, जयंत पाटलांच्या अडचणीत वाढ?

Breaking news : राजारामबापू सहकारी बँकेवर ईडीचा छापा, जयंत पाटलांच्या अडचणीत वाढ?

मोठी बातमी समोर येत आहे. राज्यात 14 ठिकाणी ईडीने छापेमारी केलीये. यात राजारामबापू सहकारी बँकेच्या कार्यालयाचाही समावेश आहे.

जाहिरात

जयंत पाटील

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 24 जून, प्रशांत बाग: मोठी बातमी समोर येत आहे. राज्यात 14 ठिकाणी ईडीने छापेमारी केलीये.  यात राजारामबापू सहकारी बँकेच्या कार्यालयाचाही समावेश आहे. 10 वर्ष जुन्या 1 हजार  कोटी रुपयांच्या संशयास्पद व्यवहारांचा तपास ईडीकडून केला जात असून बनावट कागदपत्रांच्या आधारे बँकेत खाती उघडून मोठ्याप्रमाणात रकमा वळत्या केल्याचा ईडीला संशय आहे. या घोटाळ्यात बँकेचे अधिकारी असल्याचा आरोप आहे. तसंच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याशी संबंधित ही बँक असल्याचा आरोपही केला जातोय. मात्र याबाबत जयंत पाटलांकडून अद्याप कोणतंही स्पष्टीकरण देण्यात आलेल नाही. ते आता काय प्रतिक्रिया देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. पाच व्यापाऱ्यांवर छापे  दरम्यान दुसरीकडे सांगलीमध्ये ईडीने एकाचवेळी पाच व्यापाऱ्यांवर छापे टाकले आहेत. आर्थिक अनियमिततेच्या कारणामुळे हे छापे टाकण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. रात्री अडीच वाजता ईडीचे अधिकारी संपूर्ण चौकशी आटपून मुंबईकडे रवाना झाले. या पाच व्यापाऱ्याकडे चौकशी करताना ईडीने व्यापाऱ्यांची खाती असलेल्या बँकेत देखील जाऊन चौकशी केली आहे. Maharashtra politics : अजित पवारांनी व्यक्त केलेली भीती खरी ठरणार? महाराष्ट्राच्या राजकारणात नवा ट्विस्ट सांगली शहरातील इलेक्ट्रिक साहित्याची विक्री करणाऱ्या दिनेश व सुरेश पारेख आणि अरविंद व ऋषिकेश लढ्ढा या चार बड्या व्यापाऱ्यांसह पिंटू बियाणी या व्यापाऱ्यांवर काल ईडीच्या पथकांनी छापे टाकून तपासणी केली. आर्थिक अनियमिततेच्या संशयावरून हे छापे टाकण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. याचवेळी राजारामबापू सहकारी बँकेच्या कार्यालयावरही ईडीकडून छापा टाकण्यात आला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags:

फोटो

महत्वाच्या बातम्या