अपघातात काका-पुतण्याचा मृत्यू
धाराशिव 27 जून : धाराशिवमधून अपघाताची एक हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. या घटनेत काका आणि पुतण्याला आपला जीव गमवावा लागला. गावाकडील नातेवाईकांचं लग्नकार्य उरकून काका आणि पुतण्या बार्शीकडे जात होते. हे दोघंही दगड फोडणीच्या कामासाठी बार्शीकडे जात असतानाच त्यांचा भीषण अपघात झाला. या अपघातात दोघांचाही दुर्दैवी मृत्यू झाला. काका पुतण्याला खामगाव शेगाव पालखी मार्गावरील आंदोरा गावात एका कारने उडवलं. ही धडक इतकी जबर होती, की घटनेत काका-पुतण्या दोघांचाही मृत्यू झाला. या घटनेतील आरोपी हा कळंब शहरातील नामांकित डॉक्टर आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा डॉक्टर दारू पिऊन गाडी चालवत होता. डॉक्टरच्या बेजबाबदारपणे गाडी चालवण्याने या अपघातात दोन जीव गेले आहेत. Mumbai News : मेनहोलमध्ये सफाई करताना अंगावर चढली कार; घटनेचा भयानक व्हिडीओ समोर या आरोपीवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. सिनू उत्तम दासे (नांदेड, कामटा ता. अर्धापुर) आणि माधव पुर्बा दासे (कामटा) अशी अपघातात मृत्यू झालेल्यांची नावं आहेत. या अपघातात शिनू दासे यांचा जागीच मृत्यू झाला. तर माधव दासे यांना धाराशिव येथे रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, उपचारादरम्यान त्यांचाही मृत्यू झाला. कळंब येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर सोमवारी दुपारी मृतदेह नातेवाईकांकडे सुपूर्द करण्यात आले. हा अपघात रविवारी मध्यरात्री साडेबारा वाजताच्या सुमारास घडला. कांदिवलीतही भीषण अपघात अपघाताची अशीच एक घटना मुंबईतूनही सोमवारी समोर आली होती. यात मुंबईतील कांदिवलीत कंत्राटी कामगाराचा मृत्यू झाला. मृत कामगार मेनहोलमध्ये काम करत असताना एक कार थेट त्यांच्या अंगावर चढली. ही घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली.