JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / कोल्हापुरकरांचा खरंच नाद खुळा, जगावर आलेल्या महासंकटातून काढला सुटकेचा मार्ग!

कोल्हापुरकरांचा खरंच नाद खुळा, जगावर आलेल्या महासंकटातून काढला सुटकेचा मार्ग!

चार महिन्यांपूर्वी संपूर्ण देशभरात कोरोना संसर्गामुळे (Coronavirus) हाहाकार उडाला होता.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

कोल्हापूर, 15 डिसेंबर: चार महिन्यांपूर्वी संपूर्ण देशभरात कोरोना संसर्गामुळे (Coronavirus) हाहाकार उडाला होता. महाराष्ट्रातही (Maharashtra) काही वेगळी परिस्थिती नव्हती. दक्षिण महाराष्ट्रातील प्रमुख केंद्र म्हणून कोल्हापूर (Kolhapur District) जिल्ह्याची ओळख आहे आणि हाच कोल्हापूर जिल्हा आता कोरोनामुक्तीकडे यशस्वी वाटचाल करत आहे. कोरोना रिकव्हरीमध्ये राज्यात तिसरा ठरला आहे. पहिल्या क्रमांकावर धुळे जिल्हा तर दुसऱ्या क्रमांकावर वाशिम जिल्हा असल्याची माहिती मिळाली आहे. हेही वाचा… सर्वात आधी सामान्यांना नाही तर आमदार-खासदार, VVIP ना मिळणार कोरोना लस? कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मार्च 2020 या महिन्यात पहिले 2 रुग्ण आढळले होते. त्यानंतर एप्रिल महिन्यात 9 रुग्ण आढळले मे महिन्यात 491 रुग्ण, जून महिन्यात 378 रुग्ण, जुलै महिन्यात 4800 रुग्ण, ऑगस्ट महिन्यात 17 हजार, सप्टेंबर महिन्यात 21 हजार अशा पद्धतीने रुग्णांचा आकडा 50 हजारांवर जाऊन पोहोचला होता. पण ऑक्टोबर महिन्यानंतर हा आकडा कमी होत गेला आणि कोरोना रुग्णांच्या संख्येत कमालीची घट पाहायला मिळाली. गेल्या ऑक्टोबर महिन्यात कोल्हापूर जिल्ह्यात फक्त 3400 रुग्ण सापडले तर नोव्हेंबर महिन्यात फक्त 836 रुग्ण आणि 1 डिसेंबरपासून आजपर्यंत फक्त 245 रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे कोल्हापुरकरांसाठी हा एक मोठा दिलासा म्हणावा लागेल. कोल्हापूर जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनामुळे 1600 जणांचा मृत्यू झाला आहे. तर सध्या अॅक्टिव रुग्णांची संख्या फक्त 129 आहे. ‘नो मास्क नो एंट्री’ हे वाक्य कोल्हापूरमधूनच संपूर्ण राज्यभरात दिलं गेलं. ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व लाभलेल्या कोल्हापूर मधलं आर्थिक गणितही आता रुळावर येऊ लागले आहे. अंबाबाई मंदिर, ज्योतिबा मंदिर, पन्हाळगड, नृसिंहवाडी येथील दत्तमंदिर, रंकाळा तलाव, राधानगरी अभयारण्य, चंदगड तालुक्यातील पारगड, गडहिंग्लज तालुक्यातील नेसरी गावातील प्रताप्राव गुजर स्मारक, सामानगड अशी अनेक पर्यटनस्थळ आता उघडली आहेत. हेही वाचा… एक सूर्यनमस्कार अनेक आसानं; नियमित कराल तर फिट राहाल राज्यभरातील नाही तर राज्याच्या बाहेरचे पर्यटकही आता कोल्हापूरमध्ये येऊ लागले आहेत. त्यामुळे कोल्हापूरमधील थांबलेली सगळी चक्र आता पुन्हा सुरू झाली आहेत. पण अजूनही प्रशासनाकडून मास्क नसलेल्यांवर कारवाई करत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या