• Home
  • »
  • News
  • »
  • lifestyle
  • »
  • एक सूर्यनमस्कार अनेक आसानं; नियमित कराल तर फिट राहाल

एक सूर्यनमस्कार अनेक आसानं; नियमित कराल तर फिट राहाल

सूर्यनमस्कार अनेक आसनांचे मिश्रण असल्यामुळे याचा तुम्हाला प्रत्येकवेळी फायदा होतो.

  • Share this:
आजच्या या धावपळीच्या युगात स्वतःला तंदुरुस्त ठेवणंदेखील महत्त्वाचं आहे. नियमित व्यायाम करून आपण स्वतःला तंदुरुस्त ठेवू शकतो. यामध्ये योग महत्त्वाची भूमिका पार पाडतो. नियमित योग(Yoga Posture) केल्याने शारीरिक(Physical Health) आणि मानसिक आरोग्य(Mental Health) चांगलं राहतं. आजकालच्या धावपळीच्या जीवनशैलीत तर, योगाचे महत्त्व दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. तुम्ही शारीरिक आणि मानसिक त्रासांपासून दूर राहू इच्छित असाल तर, योग हा अत्यंत सोपा आणि फायदेशीर उपाय आहे. नियमित योगा केल्याने मानसिक ताण तणाव कमी होण्यास मदत होते. सकाळी उठून तुम्ही जर प्राणायाम आणि मेडिटेशन करत असाल तर, पूर्ण दिवस तुम्हाला नक्कीच आनंद आणि उत्साही वाटेल. त्याचबरोबर विविध आजारापासून(Diseases) देखील तुमची सुटका होईल. योगामध्ये सूर्य नमस्कार(Surya Namaskar) हा सर्व आसनांचा मिलाफ असल्याने याचा मोठा फायदा होतो. व्यायाम करताना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दीर्घ श्वास घेणं, गतीचं पालन करणं आणि आपल्या क्षमतेनुसार योग करावा. सूर्यनमस्कार अनेक आसनांचे मिश्रण असल्यामुळे याचा तुम्हाला प्रत्येकवेळी फायदा होतो. प्रत्येक आसन करताना थोडावेळ विश्रांती घेणे गरजेचे आहे. त्याचबरोबर अनुलोम विलोम प्राणायामाचा दहा मिनिटे अभ्यास जरूर करावा. आज आम्ही तुम्हाला विविध आसनांचा फायदा आणि करण्याच्या पद्धती सांगणार आहोत. हे वाचा - अजूनही संपली नाही शेकडो वर्षांपूर्वीची महासाथ; 102 वर्षे जुन्या व्हायरसशी लढा सुरूच नमस्कार (Surya Namaskar) सर्व योगांमध्ये सूर्य नमस्कार खूप ताकदवान आहे. सूर्यनमस्कार शक्यतो सकाळी कोवळ्या उन्हात घालावेत. कडक उन्हात घालू नयेत. यासाठी सकाळी साधारणत: 6 ते 7 ची वेळ सर्वोत्तम आहे. सूर्यनमस्कार केल्याने तुमचे शारीरिक आणि मानसिक स्वास्थ ठीक राहते. परंतु हे योग्य पद्धतीने केल्यास याचा चांगला फायदा व्यक्तीला मिळू शकतो. प्रणाम आसन या आसनाला सुरुवात करताना दोन्ही पाय जोडून उभे राहा. दोन्ही हात एकत्र छातीजवळ घेऊन येऊन एकमेकांशी जोडावे. त्यानंतर सामान्य श्वास घेऊन हे आसन करावे. नमस्काराच्या मुद्रेमध्ये उभे राहून तुम्ही हे आसन करू शकता. यामुळे तुम्हाला रिलॅक्स वाटेल. हस्ततुन्नासन हे आसन करण्यासाठी दीर्घ श्वास घ्या आणि दोन्ही हात वर करा. हात आणि कंबरेमध्ये पाठीमागच्या दिशेला वाकून दोन्ही खांदे आणि मान मागे वळवून हे आसन करा. हस्तपाद आसन हे आसन सर्वात सोपे असून दीर्घ श्वास सोडत हळूहळू पुढे वाकत राहून दोन्ही हात कानाजवळून घेत जमिनीला टेकवा. यामध्ये तुम्ही कंबरेमध्ये पूर्ण वाकून जमिनीला हात लावण्याचा प्रयत्न करायचा आहे. अश्व संचालन आसन दोन्ही पाय सरळ करून उभे राहायचे आहे. आपल्या पंजांना जमिनीवर ठेवा. उजवा पाय मागे घेऊन डावा पाय गुडघ्यामध्ये वाकवून पुढे घ्या. याच स्थितीत मान वरून करून याच स्थितीत काही काळ रहा. अशा पद्धतीने तुम्ही 5 ते 6 वेळा हे आसन करू शकता. पर्वत आसन हे आसन करताना उभं राहत एक पाय मागे घेऊन पूर्णपणे दोन्ही हात जमिनीवर ठेवा.या आसनामध्ये तुमच्या शरीराचा आकार हा पर्वतासारखा दिसतो. अष्टांग नमस्कार दोन्ही गुडघे जमिनीवर ठेवून आपला मागील भाग थोडा उचला. त्यानंतर छाती आणि हनुवटी जमिनीवर ठेवून काहीकाळ याच स्थितीत राहावे. भुजंगासन हे आसन करताना जमिनीवर झोपून आपले पाय सरळ करावेत. त्यानंतर छातीपासून आपले अंग थोडे वर उचलून मान वरील दिशेला न्या. त्यानंतर हात सरळ ठेवून याच स्थितीत काहीवेळ राहावे. हे वाचा - कोरोनाची लस घेऊच, पण या 4 साइड इफेक्ट्सचं काय करायचं? डॉक्टरांनी दिला इशारा शवासन या आसनात पाठीवर झोपून दोन्ही पायात पुरेसे अंतर ठेवावे. पायाचे पंजे बाहेर ठेवून दोन्ही हात शरीरापासून लांब असावेत. हात मोकळे ठेवावेत. मान सरळ व डोळे बंद ठेवावेत. पूर्ण शरीर सैल सोडून द्या. त्यानंतर संपूर्ण लक्ष श्वासावर केंद्रीत करा. श्वास आत येणे व बाहेर जाण्याच्या प्रक्रियेवर नीट लक्ष द्या. हळूहळू तुम्हाला आराम वाटू लागल्यानंतर काहीकाळ याच स्थितीत राहून आराम करा. ताडासन या आसनात संपूर्ण शरीराला ताण मिळतो. त्यामुळे पोट कमी होते. त्याचबरोबर हे आसन नियमित केल्याने उंची वाढते. हात, खांदा आणि पाय यांना चांगलाच ताण मिळतो. शरीरात रक्तसंचार उत्तम होण्यास मदत होते.सर्वात सोपे हे आसन असून पर्वतासारखे तुम्हाला बसायचे आहे. या आसनाचा पचनतंत्र सुधारण्यास खूप मदत होते.त्याचबरोबर शारीरिक आणि मानसिक संतुलन राखण्यास मदत होते. अनुलोम विलोम प्राणायाम सर्व प्रथम जमिनीवर दोन मिनिट आरामात मांडी घालून बसा नंतर पद्मासनाच्या स्थितीत या व दोन मिनिटं त्याच स्थितीत येवून आपले लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर आपल्या एका हाताचा अंगठा नाकाच्या एका बाजूच्या नाकपुडी बाजूस ठेवून इतर बोटांनी दुसऱ्या बाजूच्या नाकपुडीस बंद करा. यावेळी एक नाकपुडी बंद व दुसरी खुली राहील. त्यानंतर हीच प्रक्रिया दुसऱ्या बाजूने देखील सुरु ठेवून हे आसन करावे. अनुलोम विलोम प्राणायामाचे फायदे 1)प्राणायामामुळे फुफ्फुसे मजबूत होतात. 2)बदलत्या हवामानाध्ये व्यक्ती लवकर आजारी पडत नाही 3)वजन कमी करण्यासाठी फायदेशीर 4)पचन क्रिया सुधारण्यास मदत होते 5) तणाव आणि डिप्रेशन दूर करण्यास मदत होते 6)पाठीच्या आजारात होतो फायदा सूर्य नमस्काराचे फायदे सूर्य नमस्कार हे सर्व आसनांचे मिश्रण असल्यामुळे याचा शरीराला खूप फायदा होतो. मानसिक ताणतणाव दूर होण्याबरोबरच वजन कमी करण्यास देखील मदत होते. मासिक पाळीचा त्रास असणाऱ्या महिलांसाठी सूर्यनमस्कार खूप फायदेशीर असून मणका मजबूत होण्यास देखील मदत होते.
Published by:Priya Lad
First published: