JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / महाराष्ट्र काँग्रेसमध्ये दुफळी? बाळासाहेब थोरातांनी टोचले अशोक चव्हाणांचे कान

महाराष्ट्र काँग्रेसमध्ये दुफळी? बाळासाहेब थोरातांनी टोचले अशोक चव्हाणांचे कान

महाविकास आघाडी सरकारची वर्षपूर्तीच्या दिवशी काँग्रेसमध्ये दोन गट पडल्याची चर्चा

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 27 नोव्हेंबर: वाढीव वीज बिलाचा मुद्दा आणि ऊर्जामंत्री नितीन राऊत (Nitin Raut) यांनी वीज बिलात सवलत देण्याची घोषणेवरून राज्यात रान पेटलं आहे. याच मुद्यावरून विरोधकांनी महाविकास आघाडी सरकारविरोधात (Maha Vikas Aaghadi Sarkar) सरकारला घेरलं आहे. अशातचं महाविकास आघाडी सरकारची वर्षपूर्तीच्या दिवशी काँग्रेसमध्ये दोन गट पडल्याची चर्चा आहे. नितीन राऊत यांनी वीजबिलात सवलत देण्याची घोषणा करताना जरा घाईच केली. त्यांनी घोषणा करण्याआधी पक्षात आणि मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांशी चर्चा करायला हवी होती. मात्र, त्यांनी तसं केलं नाही, अशी कबुली काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण (Minister Ashok Chavan) यांनी दिली. यावरून आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी अशोक चव्हाण यांचे कान टोचले आहे. हेही वाचा… सुप्रीम व हायकोर्टाला सुद्धा हे ‘महाराष्ट्रद्रोही’ ठरवणार का?, फडणवीसांचा सवाल नितीन राऊत यांनी वीज बिलात सवलत देण्याची घोषणा ही मंत्रिमंडळ सहकारी समवेत चर्चा करूनच केली होती, असं बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केलं आहे. वीजबिल संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि इतर मंत्रिमंडळातील सहकारी चर्चा करूनच ऊर्जामंत्री निती राऊत यांनी घोषणा केली होती. याबाबत कदाचित अशोक चव्हाण यांना माहिती नसावी, असंही बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं आहे. अशोक चव्हाण यांनी काल ‘न्यूज 18 लोकमत’शी बोलाताना नितीन राऊत यांनी वीज बिल सवलतीची घोषणा करण्याआधी मंत्रिमंडळातील सहकारी चर्चा समवेत करायला हवी होती. त्यानंतर घोषणा होणे गरजेचे होते, असं वक्तव्य केलं होतं. त्यावरून थोरात यांनी आता चव्हाण यांनाच फटकारलं आहे. आणखी काय म्हणाले होते अशोक चव्हाण? अशोक चव्हाण म्हणाले होते की, ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी वीजबिल माफीबाबत घोषणा करण्याच्या आधी मंत्रिमंडळातील सहकारी समवेत चर्चा करायला हवी होती. चर्चा न करता त्यांनी घोषणा केली. त्यामुळे समस्या निर्माण झाली आहे. राज्यात आर्थिक स्थिती बिकट त्यात वीजबिल माफी बोजा सोपा नाही. यामुळे सरकार वीज ग्राहकांना दिलासा देऊ शकत नाही, असं सांगून अशोक चव्हाण यांनी नितीन राऊत यांच्यावरच नाराजी व्यक्त केली. भाजपला सत्तापासून दूर करुन महाविकास आघाडी सरकारची सुरूवात, त्यात कोरोनामुळे काही अडचणीही आल्या. आरोग्य विभागास लक्ष पायाभूत सुविधा दिल्या. उत्पन्नापैकी 70 टक्के बजेट आरोग्य विभाग दिला. सार्वजनिक बांधकाम निधी यंदा कमी मिळाला. मागील सरकारनं देयक जास्त होती. ती अदा करण्यात आली. त्यामुळे व्यवस्था कोलमंडली होती, आता व्यवस्था आता सुधारत असल्याचं चव्हाण यांनी सांगितलं. हेही वाचा… पोटच्या मुलानं बापालाच मारलं ठार, मृतदेह घराबाहेरील रस्त्यावर फेकून केलं जेवण! किती काळ सरकार टिकेल यावर बोलताना चव्हाण यांनी भाजप अपप्रचार करत आहे. भाजपचे काही नेते सत्तापासून दूर राहु शकत नाही, असा टोला त्यांनी फडवणीसांना लगावला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या