पोटच्या मुलानं बापालाच मारलं ठार, मृतदेह घराबाहेरील रस्त्यावर फेकून केलं पोटभर जेवण!

पोटच्या मुलानं बापालाच मारलं ठार, मृतदेह घराबाहेरील रस्त्यावर फेकून केलं पोटभर जेवण!

शस्त्राने सपासप वार करून बापाला रक्ताच्या थारोळ्यात लोळवलं....

  • Share this:

नागपूर, 27 नोव्हेंबर: नागपूर शहरातील एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अमर नगर परिसरात पोटच्या मुलानं आपल्या वडिलांचा निर्घृण खून केल्याची घटना घडली आहे. ही घटना क्षुल्लक कारणावरून घडली आहे. मुलानं वडिलांवर धारदार शस्त्रानं सपासप वार करून रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह घराबाहेरील रस्त्यावर फेकला.

सम्राट रंगारी (वय-55) असं खून झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. आरोपी सिकंदर रंगारी (वय-19) याला पोलिसांनी अटक केली आहे. सिकंदरचं मानसिक संतुलन ठीक नसल्याची माहिती समोर आली आहे.

हेही वाचा.. अर्णब पाठोपाठ कंगना प्रकरणात ठाकरे सरकारचं थोबाड फुटलं, भाजपची विखारी टीका

हिंगणा पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली आहे. आरोपी सिकंदर हा एमआयडीसी येथील एका कंपनीत कामाला आहे. तर मृतक सम्राट रंगारी काय काम करायचे या संदर्भात माहिती पुढे आली आहे. घटनेच्या वेळी मृतक सम्राट आणि आरोपी सिकंदर हे दोघेही घरीच होते. दरम्यान त्यांच्यात क्षुल्लक कारणावरून बाचाबाची सुरू झाली, मात्र काही वेळातच क्षुल्लक कारणावरून सुरू झालेल्या वादाने हिंसक रूप धारण केलं. कुणालाही काही कळण्यापूर्वीच सिकंदर ने त्याच्या जवळ असलेल्या शस्त्राने सपासप वार करून सम्राट यांना रक्ताच्या थारोळ्यात लोळवलं. त्यानंतर आरोपीने आपल्या वडिलांचा मृतदेह घराच्या बाहेरील रस्त्यावर फेकून दिल्याचं तपासात समोर आलं आहे.

हेही वाचा...बायकोच्या जाचाला कंटाळून सोडली गलेलठ्ठ पगाराची नोकरी, ड्रायव्हर म्हणून करतोय काम

आरोपी सिकंदरने वडील सम्राट रंगारी यांचा मृतदेह रस्त्यावर फेकल्याच्या नंतर स्वतःला घरात कोंडून घेतलं होतं. एवढचं नाही तर आरोपीनं घरात गेल्यानंतर अंगावरील कपडे काढून जेवण केल्याची माहिती मिळाली आहे. आरोपी हा मनोरुग्ण असल्याचं बोललं जातं आहे. सध्या एमआयडीसी पोलिसांनी त्याला अटक केली असून पुढील तपास सुरू केला आहे.

Published by: Sandip Parolekar
First published: November 27, 2020, 12:57 PM IST
Tags: nagpur

ताज्या बातम्या