चिखलदरा मान्सून पर्यटन महोत्सव
Chikhaldara News: विदर्भाचे नंदनवन तसेच राज्यातील प्रमुख थंड हवेचे ठिकाण म्हणून अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा येथे वर्षभर पर्यटक मोठ्या संख्येने येतात. विशेषत: पावसाळी हंगामात मुसळधार पावसासह डोंगरदऱ्यातून कोसळणारे धबधबे, दऱ्याखोऱ्यांचे निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी पर्यटक उत्साहाने येतात. यामुळे चिखलदऱ्याचे ‘पावसाळी पर्यटन स्थळ’ म्हणून प्रसिध्दी व्हावी, यासाठी चिखलदरा मान्सून पर्यटन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. पर्यटन संचालनालय तसेच जिल्हा प्रशासन यांच्या विद्यमाने चिखलदरा येथे दि. 15 व 16 जुलै 2023 रोजी आयोजित करण्यात आलेय. Latur News : कचऱ्यापासून होणार वीज निर्मिती, पाहा लातूर महानगरपालिकेचा खास प्रकल्प Video पावसाळा सुरु झाला की, पर्यटक हे निसर्गरम्य ठिकाणी गर्दी करत असतात. राज्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी तसेच पर्यटन स्थळांची राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यापक प्रमाणामध्ये प्रसिद्धी करण्यासाठी पर्यटन संचालनालयाकडून प्रयत्न केले जात आहे. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी चिखलदरा मान्सून पर्यटन महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. यामध्ये पर्यटक आकर्षित व्हावेत म्हणून विविध साहसी उपक्रम घेतले जाणार आहेत. यासोबतच पॅरासेलिंग, पॅराग्लॅडींग, जंगल सफारी, कॉफीचे मळे, स्ट्रॉबेरी यासोबतच आदिवासी लोकांनी केलेल्या वनशेतीमध्ये रानभाज्या, रानफळे अशा विविध गोष्टींचे पर्यटकांना आकर्षण असते. हे लक्षात घेऊन हा महोत्सव राबवण्यात येत आहे. Weather Update : आज राज्यातील बहुतेक ठिकाणी मुसळधार पाऊस, तुमच्या जिल्ह्यात स्थिती काय? महोत्सवामध्ये विविध गोष्टींचं दर्शन घडणार आहे. यामध्ये हेरिटेज वॉक, आदिवासी नृत्य, आदिवासी कलादर्शन, खंजिरी वादन, वाईल्ड कॉल- पक्षांची बोलीभाषांचे सादरिकरण, निसर्ग भ्रमंती असे विविध उपक्रम घेतले जाणार आहे. यासोबतच निसर्गसंपन्न चिखलदरा याविषयावर पथनाट्याचे सादरीकरण देखील केले जाणार आहे. गाविलगड किल्ला भ्रमंती, सायकल रॅलीचे देखील आयोजन करण्यात आलंय. यामुळे पर्यटकांनी या सर्व उपक्रमांचा आनंद घ्यावा असं आवाहन पर्यटन संचालनालयाकडून केलं जातंय.