जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Latur News : कचऱ्यापासून होणार वीज निर्मिती, पाहा लातूर महानगरपालिकेचा खास प्रकल्प Video

Latur News : कचऱ्यापासून होणार वीज निर्मिती, पाहा लातूर महानगरपालिकेचा खास प्रकल्प Video

Latur News : कचऱ्यापासून होणार वीज निर्मिती, पाहा लातूर महानगरपालिकेचा खास प्रकल्प Video

लातूर महानगरपालिकेच्या वतीने कचऱ्याच्या माध्यमातून वीज निर्मितीचा प्रकल्प उभारण्यात आला आहे. हा प्रकल्प लवकरच कार्यान्वित होणार आहे.

  • -MIN READ Latur,Maharashtra
  • Last Updated :

लातूर, 12 जुलै: प्रत्येक गावात आणि शहरामध्ये कचऱ्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे शहरातील ओल्या कचऱ्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावावी यासाठी लातूर महानगरपालिकेच्या वतीने ओल्या कचऱ्याच्या माध्यमातून वीज निर्मितीचा म्हणजे बायोगॅस प्रकल्प उभारण्यात आला आहे. हा प्रकल्प लवकरच कार्यान्वित होणार आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून महिन्याला 10 हजार युनिटची वीज निर्मिती होणार असल्याने कचरा डेपो वरील मनपाच्या विद्युत देयकात 50 टक्के कपात होऊन महापालिकेचा आर्थिक फायदा होणार आहे. वीज निर्मिती होणार गेल्या काही वर्षांपासून मनपाच्या वतीने लातूर शहरात कचरा ओला आणि सुक्याच्या स्वरूपात वेगवेगळ्या करून घेण्यात येत आहे. विशेषतः ओला कचरा वेगळा गोळा करण्यासाठी महानगरपालिकेच्या वतीने सातत्याने प्राधान्य दिले आहे. या ओल्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी महानगरपालिकेला सातत्याने विविध अडचणींना सामोरे जावे लागत होते. त्यामुळे शहरात दुर्गंधी पसरून आरोग्यावरही परिणाम होत होता.

News18लोकमत
News18लोकमत

ओल्या कचऱ्याच्या माध्यमातून वीजनिर्मिती करण्याचा प्रकल्प महानगरपालिकेच्या वतीने उभारण्याचे नियोजन करण्यात आले होते त्या अनुषंगाने पाच टन क्षमतेचा बायोगॅस प्रकल्प उभारण्यात आलेला असून तो लवकरच कार्यान्वित होणार आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून ओल्या कचऱ्याची वीज निर्मिती होणार असून दररोज तीनशे ते साडेतीनशे युनिट पर्यंत वीज निर्मिती होणार असल्याची माहिती महानगरपालिकेचे आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी दिली आहे. ओला कचरा वेगळा करणे बंधनकारक शहरात मोठ्या प्रमाणात हॉटेल्स असून हॉटेल्समधून ओला कचरा वेगळा करून घेण्यासाठी नुकतीच हॉटेल मालकांची बैठकी मनपाच्या वतीने घेण्यात आली आहे. त्याचबरोबर शहरातील उद्योग भवन परिसरात असलेल्या ट्युशन एरियामध्ये मोठ्या प्रमाणात मेस आणि हॉस्टेल्स हे चालतात त्यांची बैठक महानगरपालिकेने घेऊन सर्वांना ओला कचरा वेगळा करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

Latur News: शेती न करता कमवा हेक्टरी सव्वा लाख रुपये, शिंदे सरकारची खास योजना, Video

लातूर शहरातील कचरा डेपो वर पाच टन क्षमतेचा बायोगॅस प्रकल्प उभा करण्यात आला असून या माध्यमातून दररोज तीनशे ते साडेतीनशे युनिट एवढी वीज निर्मिती केली जाणार आहे. सध्या प्रायोगिक तत्त्वावर शहरातील काही पथदिवे हे या विजेवर चालवणार आहेत. यासोबतच येणाऱ्या काळात कचरा संकलनासाठी वापरली जाणारी ई व्हेकल्स चार्ज करण्यासाठी चार्जिंग स्टेशन या बायोगॅस प्रकल्पावरती उभारणार असल्याची माहिती बाबासाहेब मनोहरे यांनी दिली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: latur , Local18
  • First Published :
जाहिरात
जाहिरात