JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / दिल्लीतून मुख्यमंत्री बदलासाठी चाचपणी; राऊतांनंतर ठाकरे गटाच्या आणखी एका मोठ्या नेत्याचा गौप्यस्फोट

दिल्लीतून मुख्यमंत्री बदलासाठी चाचपणी; राऊतांनंतर ठाकरे गटाच्या आणखी एका मोठ्या नेत्याचा गौप्यस्फोट

राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून मुख्यमंत्री बदलाची चर्चा सुरू आहे. संजय राऊतांनंतर आता ठाकरे गटाच्या आणखी एका नेत्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंबद्दल मोठा गौप्यस्फोट केला आहे.

जाहिरात

ठाकरे गटाच्या नेत्याचा मोठा गौप्यस्फोट

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

छत्रपती संभाजीनगर, 30 एप्रिल, अविनाश कानडजे :  राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून मुख्यमंत्री बदलाची चर्चा सुरू आहे. मात्र शिंदे गटाकडून सरकार स्थिर असून, मुख्यमंत्रिपदी एकनाथ शिंदे हेच राहणार असल्यचं सांगण्यात येत आहे. ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी यावरून एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. सरकारचे कमी दिवस उरले आहेत, भाजपकडून मुख्यमंत्री बदलासाठी चाचपणी सुरू असल्याचा गौप्यस्फोट चंद्रकांत खैरे यांनी केला आहे. नेमकं काय म्हणाले खैरे?  चंद्रकांत खैरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. सरकारचे कमी दिवस उरले आहेत. भाजपकडून मुख्यमंत्री बदलासाठी चाचपणी सुरू झाली आहे. हे सरकार लवकरच पडणार आहे. न्यायालयाचा निर्णय त्यांच्या विरोधात लागणार आहे, हे त्यांना माहीत आहे. त्यामुळे भाजपाने मुख्यमंत्री बदलाची चर्चा सुरू केली आहे. या सरकारचे कमी दिवस उरल्याचं चंद्रकांत खैरे यांनी म्हटलं आहे. आज शाहांसोबत चर्चा; उद्या मुख्यमंत्र्यांची पवारांसोबत बैठक, मोठं कारण समोर राऊतांचा गौप्यस्फोट  दरम्यान काही दिवसांपूर्वी संजय राऊत यांनी देखील मोठा गौप्यस्फोट केला होता. दिल्लीतून मुख्यमंत्री बदलाच्या हालचाली सुरू झाल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं होतं. शिंदे गटाची गरज संपली आहे, त्यामुळे भाजप मुख्यमंत्री बदलण्याची शक्यता असल्याचाही टोला त्यांनी लगावला होता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या