अपूर्वा तळणीकर, प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर, 22 जून : छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त महाराष्ट्राचेच नाही तर संपूर्ण देशाचे श्रद्धास्थान आहेत. शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रात स्वराज्याची स्थापना केली. त्यांचा इतिहास हा आजही सर्वांना प्रेरणा देणार आहे. शिवाजी महाराजांच्या इतिहासाची प्रेरणा घेऊन केरळमधील एक तरुण महाराष्ट्रात एका खास मोहिमेवर असून सध्या तो छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आहे. काय आहे मोहीम? केरळच्या कालिकत जिल्ह्यातील शिवराज गायकवाड हा वर्षभरापासून राज्यातील सर्व गड किल्ले सर करतोय. शिवराज सौदी अरेबिया मध्ये काही दिवस नोकरी केली. त्यानंतर तो भारतामध्ये परतला. त्याला महाराजांच्या इतिहासाबद्दल जास्त माहिती नव्हती. त्याला हिंदी किंवा मराठी भाषा येत नसल्यामुळे त्यांने इंग्रजी पुस्तक वाचली. त्यानंतर त्यानं सोशल मीडियावरुनही महाराजांबद्दलची माहिती मिळवली. त्यामुळे तो चांगलाच प्रेरित झाला आणि त्यानं गड-किल्ले सर करण्याचा निर्णय घेतला.
नावही बदललं केरळच्या या तरुणावर शिवाजी महाराजांचा इतका प्रभाव पडलाय. त्यानं चक्क स्वत:चं नाव ही बदललंय. मुळचा हमरास एम.के. असलेला हा तरूण आता चक्क शिवराज गायकवाड झालाय. त्यानं नाव बदलण्याची सर्व कायदेशीर प्रक्रिया देखील पूर्ण केलीय. रायगडावर शिवरायांचं चांदीचं शिल्प, कुणी केलं तयार? पाहा हा VIDEO कसा केला प्रवास? शिवराजनं आत्तापर्यंत 414 दिवसांमध्ये 414 दिवसांमध्ये साडेतेरा हजार किलोमीटर प्रवास सायकलवर पूर्ण केलाय. त्यानं महाराष्ट्रातील 370 किल्ल्यांपैकी 210 किल्ले हे सर केले आहेत. सध्या तो छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे. संभाजीनगरमधील देवगिरी आणि भांगसी मातागड त्यानं सर केलेत. आपल्याला देवगिरी किल्ला खूप आवडल्याचं शिवराजनं सांगितलं. ‘मी तेरा महिन्यांपासून हा प्रवास करतोय. मला महाराष्ट्रात खूप चांगला अनुभव आलाय. मी आत्तापर्यंत 210 किल्ले सर केले आहेत. या किल्ल्याचं बांधकाम खूप सुंदर आहे. या किल्ल्यांचं संवर्धन आपण केलं पाहिजे. स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगडावर मी या मोहिमेचा समारोप करणार आहे.’ असं शिवराजनं सांगितलं.