अपूर्वा तळणीकर छत्रपती संभाजीनगर 10, मे : बारावीनंतर काय करावे हा प्रत्येक पालकासमोर आणि विद्यार्थ्यांसमोर प्रश्न असतो. कोणत्या कोर्ससाठी प्रवेश घ्यावा ज्यामुळे भविष्यात चांगली नोकरी मिळेल अशी चिंता विद्यार्थ्यांना आणि पालकांना असते. तुम्हीही कोर्सच्या शोधात असाल तर छत्रपती संभाजीनगर येथे असलेल्या दिल्ली येथील इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी अर्थात इग्नूच्या प्रवेश प्रक्रियेला आज (10 मे) बुधवारपासून सुरुवात होत आहे. छत्रपती संभाजीनगर येथे विवेकानंद इग्नू केंद्र आहे. आज पासून येथे प्रवेश प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. छत्रपती संभाजीनगरातील स्टडी सेंटरमध्ये 50 हून अधिक कोर्सेस आहेत. इग्नूमध्ये एकाच वेळेस दोन वेगवेगळ्या कोर्सेसना प्रवेश घेता येईल.
कोणत्या कोर्ससाठी प्रवेश सुरू? आपत्ती व्यवस्थापन, पर्यावरण अध्ययन, खाद्य आणि पोषण मार्गदर्शन प्रमाणपत्र, सूचना प्रौद्योगिकी, उपभोक्ता संरक्षण पोषण आणि चाइल्ड केअर, पर्यटन अध्ययन, व्हिजुअल आर्ट्स, ग्रामीण विकास आदी प्रामणपत्र कोर्सेसना प्रवेश घेता येईल. इग्नू प्रवेशांमध्ये पदवी स्तरावर वेगवेगळे कोर्सेस आहेत यामध्ये बीसीए, बीए, बी कॉम, बी एस डब्ल्यू या कोर्सेसना प्रवेश घेता येईल. मास्टर्स डिग्री प्रोग्राम्समध्ये पदव्युत्तर स्तरावर एम. ए. इंग्लिश, हिंदी, एमएस डब्ल्यू, मानसशास्त्र, इतिहास, अर्थशास्त्र, हिंदी, राज्यशास्त्र, लोकप्रशासन, समाजशास्त्र, कॉमर्स, रूरल डेव्हलपमेंट तसेच पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा प्रोग्राम्स मध्ये ट्रान्सलेशन, गांधी आणि पीस स्टडीज, रूरल डेव्हलपमेंट, जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशन, उच्चशिक्षण, डिझास्टर मॅनेजमेंट, बुक पब्लिशिंग, टुरिझम , क्रिएटिव्ह रायटिंग इन इंग्लिश अशा वेगवेगळ्या कोर्सेसना प्रवेश घेता येईल. खबरदार! मुलांना RTE प्रवेश नाकाराल तर शाळेची मान्यताच होईल रद्द; या ZPच्या सीइओंनी काढले आदेश ऑनलाइन आणि ऑफलाइन कोर्स उपलब्ध कला, इंग्रजी आणि पर्यटन अध्ययन, बीसीए सामाजिक कार्य, डिप्लोमा अभ्यासक्रम, डिप्लोमा इन क्रिएटिव्ह रायटिंग, लहान मुलांची देखभाल आदी अभ्यासक्रमांचे साहित्य इग्नू ऑनलाइन आणि ऑफलाइन उपलब्ध करून देत असल्याची माहिती समन्वयकांनी दिली आहे. शिवाय इग्नूचा अभ्यासक्रम हा एमपीएससी, यूपीएससीच्या धरतीवर असल्याने तरुणांना त्याचा जास्त फायदा होतो. छत्रपती संभाजीनगरमधील स्टडी सेंटरमध्ये 50 हून अधिक कोर्सेस आहेत. ज्यात तरुण थेट प्रवेश घेऊ शकतात. 10 मे पासून ही नोंदणी प्रक्रिया सुरू होणार आहे. Job Alert : तरुणांना मोठी संधी, सोलापूर महापालिकेत होणार 340 पदांची मेगाभरती SC / ST संवर्गातील विद्यार्थ्यांना बीसीए, बीए, बी कॉम, बी एस डब्ल्यू प्रमाणपत्र अभ्यासक्रम सहा महिने आणि पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा कोर्स एक वर्षासाठी मोफत प्रवेश देण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी इग्नूच्या www.ignou.ac.in ह्या संकेतस्थळाला भेट द्या. विवेकानंद महाविद्यालयात कार्यालयीन वेळेमध्ये (सोमवार ते शनिवार 4 ते 7, रविवार 10.30 ते 1.30) तुम्ही भेट देऊ शकता. Phone No. 0240-2348153