JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / मित्रांसोबत जेवण केला अन् फिरून येतो म्हणाला तो आलाच नाही, काय घडलं असं

मित्रांसोबत जेवण केला अन् फिरून येतो म्हणाला तो आलाच नाही, काय घडलं असं

साताऱ्यात एक धक्कादायक घटनासमोर आली आहे. मेकॅनिकल इंजिनीयरिंगचे शिक्षण घेणाऱ्या 22 वर्षीय अनिल सुरेश जाधव या विद्यार्थ्याने आत्महत्या केली.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

छत्रपती संभाजीनगर, 17 मार्च : छत्रपती संभाजीनगरमधील साताऱ्यात एक धक्कादायक घटनासमोर आली आहे. मेकॅनिकल इंजिनीयरिंगचे शिक्षण घेणाऱ्या 22 वर्षीय अनिल सुरेश जाधव या विद्यार्थ्याने आत्महत्या केली. मित्रांसोबत रात्री त्याने जेवण केले. त्यानंतर पायी चालून येतो, असे म्हणून तो घराबाहेर पडला. यानंतर बराच वेळ झाल्याने शोध सुरू केल्यावर रात्री एक वाजेच्या रेल्वेसमोर झोपून त्याने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी त्याच्या पॅण्टच्या खिशातील एटीएम कार्डवरून ओळख पटवत गुरुवारी दुपारी त्याच्या कुटुंबाशी संपर्क केला.

मूळ भोकरदन तालुक्यातील वाल्सा-खाल्सा या गावचा असलेला अनिल दोन वर्षांपूर्वी शहरात शिक्षणासाठी आला होता. एमआयटी अभियांत्रिकी महाविद्यालयात मेकॅनिकल अभियांत्रिकीचे तो शिक्षण घेत होता.

मुली फुटबॉल खेळत होत्या, प्रियकर आला अन् मैदानातच तिच्या हाताची नस कापली पुढे भयानक घडलं

संबंधित बातम्या

महाविद्यालयाच्या मागील सातारा परिसरात काही मित्रांसोबत खाेली घेऊन तो राहत होता. बुधवारी जेवणासाठी ते बीड बायपास परिसरात गेले होते.

जेवण झाल्यानंतर चक्कर मारून येतो, असे म्हणून तो गेला असता परतलाच नाही. रात्री दीड-पावणेदोनच्या सुमारास जालन्याकडून छत्रपती संभाजीनगरकडे येणाऱ्या रेल्वेखाली त्याने आत्महत्या केली. उस्मानपुरा पोलिसांनी घटना कळताच तत्काळ धाव घेतली. अनिलच्या मृतदेहाची छिन्नविछिन्न अवस्था झाली होती. जमादार राणा जाधव अधिक तपास करत आहेत.

एकच बिल्डिंग, 24 तासांमध्ये झालं होत्याचं नव्हतं, मुंबईतली धक्कादायक घटना
जाहिरात

एटीएमवरून ओळख पटली, कारण मात्र अस्पष्ट : अनिलने बाहेर जाताना सोबत फक्त एटीएम कार्ड नेले होते. घटनास्थळी इतर कुठलेही कागद, मोबाइल मिळाला नाही. पोलिसांनी त्या कार्डवरून गुरुवारी दुपारी बँकेशी संपर्क साधला. त्यानंतर त्याच्या खात्यातील माहितीवरून कुटुंबाशी संपर्क साधण्यात आला. त्याचे वडील गावाचे पोलिस पाटील असून आई गृहिणी आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या