पटना, 17 मार्च : बिहारमधील पूर्णिया शहरातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील मैदानावर आयोजित जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये मोठी खळबळजणक घटना घडली आहे. क्रीडा स्पर्धेदरम्यान एका मद्यधुंद मुलाने मैदानावर धिंगाणा घातला. मुलींच्या फुटबॉल स्पर्धेदरम्यान या तरुणाने चांगलाच गोंधळ घातला. दारू पिऊन आलेल्याने फुटबॉलच्या मैदानावर मुलीचा हात धरत थेट नस कापली. हे पाहून मैदानावरील मुली घाबरल्या होत्या तातडीने त्यांनी सुरक्षीत स्थळी जात मदत घेतली. यादरम्यान पोलिसांनी मद्यधुंद मुलाला ताब्यात घेतले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार मंगळवारी शाळेच्या मैदानावर नियोजित कार्यक्रमानुसार चार दिवसीय 'दक्ष' या क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन झाले. 14 ते 17 मार्च या कालावधीत होत असलेल्या क्रीडा स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी सर्व सामने नियोजित वेळेनुसार सुरू होते. या मैदानावरील फुटबॉल स्पर्धा उपरेल व रामबाग येथील मुलींच्या विभागातील खेळाडूंमध्ये होणार होती. यादरम्यान प्रशिक्षकाने शिट्टी वाजवताच सर्व खेळाडू मैदानावर रांगेत उभे राहिले.
स्पर्धा सुरू होणार असतानाच एक दारुडा मैदानात आला. त्याने कॅमेऱ्याकडे बघितले आणि आपण एका मुलीवर प्रेम करत असल्याचे सांगितलं. तो तिच्याशी लग्न करणार असल्याचेही तो म्हणाला. परंतु मुलगी त्याच्याशी ब्रेकअप केल्याने रागातून तिच्या हाताची नस कापली. हा प्रकार होताच मैदानात एकच खळबळ उडाली होती.
याबाबत माहिती मिळताच पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोहोचले त्यांनी तरुणाला ताब्यात घेतले. पोलिसांच्या ताब्यात असूनही तरुणीशी लग्न करायचे आहे, असे सांगत तो ओरडत राहिला. तो कोणत्या मुलीबद्दल बोलत होता हे स्पष्ट झाले नसले तरी. हा तरुण पूर्णियातील चित्रवाणी रोडचा रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. हा परिसर क्रीडा मैदानाच्या शेजारी आहे.
शेजाऱ्याने अंघोळ करतानाचा व्हिडिओ बनवला, ब्लॅकमेलच्या भीतीने मुलीने उचललं धक्कादायक पाऊल
या घटनेबाबत फुटबॉल स्पर्धेचे प्रशिक्षक रजनीश कुमार यांनी सांगितले की, मद्यधुंद तरुण अचानक खेळाच्या मैदानात आला आणि मुलींना फुटबॉल खेळताना पाहून आक्षेपार्ह गोष्टी बोलल्या. यादरम्यान व्यसनी व्यक्तीचा हातही कापला, त्यामुळे रक्त वाहत होते. प्रथमदर्शनी या तरुणाकडे पाहून त्याचे मानसिक संतुलन बरोबर नसल्याचे दिसते. तरुणाला स्थानिक पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bihar, Crime news, Football