मुंबई, 16 मार्च : एकाच बिल्डिंगमध्ये दोन जणांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मुंबईत घडली आहे. मुंबईच्या कांदिवली भागातल्या एका बिल्डिंगमध्ये वेगवेगळ्या घटनांमध्ये 18 वर्षांचा मुलगा आणि 56 वर्षांच्या मुलीने आयुष्य संपवलं आहे. या दोन घटनांमुळे बिल्डिंगमधले रहिवासी आणि आसपासच्या परिसरात खळबळ पसरली आहे. आत्महत्या करणारी महिला तिच्या मुलीला मुल होत नसल्यामुळे चिंतेत होती. या महिलेनं मंगळवारी तिच्या राहत्या घरात फास लावून घेतला. मुलीला बाळ होत नसल्यामुळे महिला प्रचंड तणावात असल्याची माहिती समोर आली आहे. आईच्या आत्महत्येमुळे तिची मुलगी धक्क्यात आहे. याच बिल्डिंगमध्ये 24 तासांमध्ये आत्महत्येची दुसरी घटनाही घडली. 18 वर्षांच्या मुलाने बिल्डिंगमधून उडी मारली, यात त्याचा जागीच मृत्यू झाला. मुलाचे वडील त्याला अभ्यास करत नसल्यामुळे ओरडले होते, त्यामुळे नाराज झालेल्या मुलाने उडी मारत टोकाचा निर्णय घेतला. यानंतर बिल्डिंगचा गार्ड आणि रहिवाश्यांनी पोलिसांना याबाबतची माहिती दिली. पोलिसांनी मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. याप्रकरणी पोलिसांनी अकस्मित मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







