JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / कार्यकर्त्याचा आगाऊपणा मायाभाईच्या अंगलट; शुभेच्छा पोस्टरमध्ये हातात दाखवली बंदूक मग पोलिसांनीही...

कार्यकर्त्याचा आगाऊपणा मायाभाईच्या अंगलट; शुभेच्छा पोस्टरमध्ये हातात दाखवली बंदूक मग पोलिसांनीही...

छत्रपती संभाजीनगरमध्ये अनेक ठिकाणी वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे पोस्टर लावण्यात आले आहेत, हे पोस्टर चर्चेचा विषय ठरले आहेत.

जाहिरात

वाढदिवसाच्या पोस्टर प्रकरणात गुन्हा दाखल

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

छत्रपती संभाजीनगर, 29  जुलै, अविनाश कानडजे : छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शहरात अनेक ठिकाणी मायाभाई नावाच्या व्यक्तीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे पोस्टर लागले आहेत. या पोस्टरची शहरभर चर्चा सुरू आहे. याला कारण देखील तसेच आहे. ज्या व्यक्तीचा फोटो या पोस्टरवर लावण्यात आला आहे, त्या व्यक्तीच्या हातात बंदूक दिसत आहे. त्यामुळे या प्रकरणाची पोलिसांकडून गंभीर दखल घेण्यात आली आहे. बंदुकीच्या छायाचित्रासह शुभेच्छांची बॅनरबाजी करणे या भाईच्या चांगलच अंगलट आलंय. याप्रकरणी जवाहरनगर पोलिसांनी कारवाई केली आहे. पोलिसांकडून हे बॅनर हटवण्यात आलं आहे. या प्रकरणी पोलिसांनी स्वयंघोषित भाऊ संतोष ज्ञानेश्वर थोरात आणि माया भाई उर्फ प्रशांत सासवडे या दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.

Buldhana accident : ट्रॅव्हल्स अपघातातील मृतांचा आकडा सातवर; अंगावर काटा आणणारे अपघाताचे photos

संबंधित बातम्या

या दोघांना पोलिसांनी शुक्रवारी रात्री उशिरा ताब्यात घेतलं, त्यांची चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. या प्रकरणामुळे शहरात खळबळ उडाली असून, या पोस्टरची जोरदार चर्चा सुरू आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या