JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / विनोद तावडे, पंकजां मुंडेनंतर आता या नेत्याची लॉटरी, पक्षश्रेष्ठींकडून नवी जबाबदारी

विनोद तावडे, पंकजां मुंडेनंतर आता या नेत्याची लॉटरी, पक्षश्रेष्ठींकडून नवी जबाबदारी

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्याकडून केंद्रीय पदाधिकाऱ्यांची घोषणा

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 15 नोव्हेंबर: भाजप नेत्या पंकजा मुंडे (BJP Leader Pankja Munde) व माजी मंत्री विनोद तावडे (Vinod Tavade) यांची भाजपच्या राष्ट्रीय सचिवपदी वर्णी लागली. त्यानंतर आता पक्षश्रेष्ठींकडून भाजप नेते आशिष शेलार (BJP MLA Ashish Shelar) यांनी दिवाळी गिफ्ट मिळालं आहे. आमदार आशिष शेलार यांना केंद्रीय नेतृत्त्वाकडून नवी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. आशिष शेलार यांची ग्रेटर हैदराबाद महानगरपालिका (जीएचएमसी) निवडणुकीसाठी (Greater Hyderabad Municipal Corporation election) भाजपचे सहप्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. हेही वाचा… मुंबईत ‘मातोश्री’वर आंदोलनासाठी निघालेल्या राणा दाम्पत्याला घेतलं ताब्यात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी आज केंद्रीय पदाधिकाऱ्यांची घोषणा केली. त्यात राष्ट्रीय महामंत्री भूपेंद्र यादव यांची ग्रेटर हैदराबाद महानगरपालिका (जीएचएमसी) निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाचे निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्ती केली आहे. तर कर्नाटकचे आरोग्यमंत्री डॉ. सुधाकर, महाराष्ट्रातील नेते आशिष शेलार, गुजरातचे नेते प्रदीप सिंह वाघेला आणि कर्नाटकचे नेते सतीश रेड्डी यांची सहप्रभारी म्हणून निवड केली आहे.

संबंधित बातम्या

कोणाला कुठली जबाबदारी? दरम्यान, मराठवाड्यातील प्रमुख नेत्यांपैकी एक असलेल्या पंकजा मुंडे यांना मध्य प्रदेशच्या सहप्रभारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. तर भाजप नेते आणि माजी शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्याकडे भाजपने हरियाणाचे प्रभारीपद सोपवले आहे. 2019 विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा परळी मतदारसंघातून पराभव झाला होता. पक्षातून कूरघोडी झाल्यामुळे आपला पराभव झाला, अशी भावना त्यांची झाली होती. विशेष म्हणजे गोपीनाथ गडावर मेळावा घेऊन त्यांनी आपली नाराजीही व्यक्त केली होती. पंकजांची विधान परिषदेवर वर्णी लागेल, अशी चर्चा होती. मात्र, तीही फोल ठरली. त्यामुळेही त्या नाराज असल्याची जोरदार चर्चा होती. अखेर राष्ट्रीय सचिवपदी संधी देऊन त्यांची नाराजी पक्षानं दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. हेही वाचा… ‘सतीश चव्हाणांनी पदवीधरांचा वाटोळं केलं, बोराळकर हेही त्यांचीच B टीम’ तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात शिक्षणमंत्री असलेल्या विनोद तावडे यांना यांच्याकडे भाजपने हरियाणाचे प्रभारीपद सोपवण्यात आलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या