मुंबईत 'मातोश्री'वर आंदोलनासाठी निघालेल्या राणा दाम्पत्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात

मुंबईत 'मातोश्री'वर आंदोलनासाठी निघालेल्या राणा दाम्पत्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात

मुख्यमंत्र्यांना भेटू न देणं म्हणजे लोकशाहीची हत्या

  • Share this:

अमरावती, 15 नोव्हेंबर: नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना (Farmer) तातडीने मदत देण्याच्या मागणीसाठी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या 'मातोश्री' बंगल्यावर आंदोलनासाठी निघालेले आमदार रवी राणा (Bdanera MLA Ravi Rana)आणि खासदार नवनीत राणा (Amaravati MP Navneet Rana) यांना अमरावती पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

पोलिसांनी राणा दाम्पत्याला पोलीस आयुक्त कार्यालयात नेलं आहे. जगाचा पोशिंदा शेतकऱ्यांच्या हक्कासाठी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भेटू न देणं म्हणजे लोकशाहीची हत्या, असा घणाघाती आरोप राणा दाम्पत्यानं केला आहे. तर खासदार नवनीत राणा यांनी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली.

हेही वाचा...'सतीश चव्हाणांनी पदवीधरांचा वाटोळं केलं, बोराळकर हेही त्यांचीच B टीम'

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याच्या मागणीसाठी रास्तारोको केल्यानंतर बडनेराचे आमदार रवी राणा यांना शुक्रवारी अटक करण्यात आली होती. रविवारी अखेर आमदार रवी राणा यांना अमरावती जिल्हा कोर्टानं जामीन मजूर केला. रवी राणा यांच्यासह अटकेतील शेतकऱ्यांची तुरुंगातून सुटका करण्यात आली.

तुरुंगातून बाहेर येताच आमदार रवी राणा यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना डिवचलं होतं. राज्य सरकारवरही त्यांनी गंभीर आरोप केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वातील राज्य सरकार शेतकऱ्यांचा आवाज दाबत असल्याचं आमदार राणा यांनी म्हटलं आहे. हजारो शेतकऱ्यांसह सोमवारी (16 नोव्हेंबर) 'मातोश्री'वर आंदोलन करण्याचा इशारा दिला.

पतीच्या सुटकेसाठी नवनीत राणा दुसऱ्या दिवशीही रस्त्यावर

दरम्यान, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपये मदत मिळावी, लॉकडाऊन काळात आलेले वीज बिल निम्मे माफ करण्यात यावे आणि तुरुंगात असलेले आमदार रवी राणा (MLA Ravi Rana) यांची सुटका करावी, या मागणीसाठी खासदार नवनीत राणा (MP Navneet Rana) दुसऱ्या दिवशीही रस्त्यावर उतरल्या.

अमरावतीत महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला अभिवादन करून खासदार नवनीत राणा यांच्या रविवारी नेतृत्वात मोर्चा काढण्यात आला. शहरातील राजकमल चौक येथे नवनीत राणा यांनी कार्यकर्त्यांसह तब्बल दोन तास रास्ता रोको आंदोलन केलं. सरकार विरोधात घोषणाबाजी करत युवा स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा प्रतिकात्मक पुतळा देखील जाळला.

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी अमरावतीत आंदोलन केल्यानंतर बडनेराचे आमदार रवी राणा यांनी अटक करण्यात आली आहे. त्यांची रवानगी ही कारागृहात करण्यात आली आहे. भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी रवी राणा यांच्या अटकेबद्दल महाविकास आघाडी सरकारचा निषेध केला आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करून रवी राणा यांच्या अटकेबद्दल ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.'शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आणि त्यांना तातडीने मदत मिळावी यासाठी आमदार रवी राणा यांनी सुद्धा जेलभरो आंदोलन केले. आमदार रवी राणा हे तर आजही दिवाळीच्या दिवशी कारागृहात आहेत. शेतकऱ्यांची दिवाळी काळी करणाऱ्या राज्य सरकारचा आम्ही निषेध करतो' असं फडणवीस म्हणाले आहे. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आणि त्यांना तातडीने मदत मिळावी यासाठी आमदार रवी राणा यांनी जेलभरो आंदोलन केलं होतं.

हेही वाचा..महाराष्ट्र सरकारचा दारूण पराभव! म्हणत भाजप नेते राम कदमांनी केली मोठी गर्जना!

आमदार रवी राणा यांच्यासह 110 शेतकरी व कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली होती. संतप्त शेतकऱ्यांनी यावेळी राष्ट्रीय महामार्गावर टायरची जाळपोळ केली यावेळी आंदोलनाला हिंसक वळण लागले होते.

Published by: Sandip Parolekar
First published: November 15, 2020, 7:11 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading